NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

मनपा उर्दू शाळा हलविण्याच्या निर्णयाविरोधात पालकांचा रोष; वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण महानगरतर्फे निवेदन सादर



नांदेड :नांदेड शहरातील मनपा उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक 9 ही शाळा हलविण्याच्या हालचालींमुळे परिसरातील पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. सदरील निर्णयामुळे शाळेचे विद्यार्थ्यांचे शिक्षण अडथळले जाईल आणि त्यांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशी गंभीर भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, नांदेड दक्षिण महानगर तर्फे पालकांच्या शिष्टमंडळाने प्रशासनाकडे निवेदन देत शाळा हलविण्याचा निर्णय त्वरित रद्द करण्याची जोरदार मागणी केली.

निवेदनात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या:
1. सदर शाळा हलविण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये.
2. शाळेची अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षितता अबाधित ठेवावी.
3. स्थानिक संस्था आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद ठेवून उपाययोजना कराव्यात.
4. नागरिकांच्या भावनांशी खेळणाऱ्या किंवा अलोकशाही निर्णयांपासून टाळावे.
    5. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला, मोकळ्या जागेत सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी तीन मोठ्या पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या आहेत, ज्या कार्यरत आहेत.

निवेदनावर फारुक अहमद (प्रदेश उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), इंजि. प्रशांत इंगोले, शाम कांबळे, विठ्ठल गायकवाड, अतिक लीडर, यांच्यासह पदाधिकारी व पालकांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या प्रसंगी वंचितच्या वतीने फारुक अहमद यांनी सांगितले की,
“सामाजिक व्यासाचे प्रतिक मानले जाणारे व मुस्लीम बोर्डींग सुरु करुन मुसलमानांसाठी मुख्य प्रवाहाच्या शिक्षणाचा आग्रह धरणारे राजश्री शाहु महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी आम्हाला शाळेचा विषय घेऊन लढावे लागत आहे हे दुःखद आहे कारण शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून एका समाजाच्या भविष्याची व अस्तित्वाची ओळख असते. जर ही शाळा हलवली गेली, तर तो केवळ शैक्षणिक नाही, तर सामाजिक अन्याय असेल. आमचा संघर्ष हा प्रत्येक वंचित आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आहे.”

वंचित बहुजन आघाडीने प्रशासनास इशारा दिला की, जर पालकांच्या भावना आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर गदा आली, तर जनआंदोलन उभारले जाईल आणि त्याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील.