NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

म. युसुफ म. मौलाना यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सत्कार

NANDED TODAY: 8 July 2025:- नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाचे वाहनचालक म. युसूफ म. मौलाना हे नियत वयोमानानूसार 30 जुन 2025 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात आज निरोप समारंभ संपन्न झाला.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, उपसंपादक अलका पाटील, वरिष्ठ लिपिक काशिनाथ आरेवार, लिपिक टंकलेखक अनिल चव्हाण, शिपाई चंद्रकांत गोधने यांची उपस्थित होती.

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  यावेळी श्री. धोंगडे, श्रीमती पाटील व श्री. आरेवार यांनी मनोगत व्यक्त करुन श्री. म.युसुफ म. मौलाना यांना सेवानिवृतीबाबत व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रारंभ कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तु देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.