NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

नांदेडमध्ये ‘जॉय ई-बाईक’च्या नवीन NEMO मॉडेलचे भव्य लोकार्पण, खासदार रवींद्र चौहान यांच्या हस्ते पहिल्या गाडीचे वितरण

नांदेड, १७ जुलै (प्रतिनिधी): इलेक्ट्रिक दुचाकी तयार करणारी नामांकित कंपनी जॉय ई-बाईक ने आपले नवीन मॉडेल “NEMO” नुकतेच बाजारात आणले आहे. नांदेडमधील अधिकृत वितरक ग्रीन रायडर शो-रूममध्येही ही अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक बाईक आता उपलब्ध झाली असून आज येथे या मॉडेलचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थिती व हस्ते नवीन बाईकचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सोनाई डेअरीचे वितरक सलमान एजन्सीचे मालक जहीर अहमद खान यांना, त्यांनी आधीच बुक केलेल्या बाईकचे वितरण खासदारांच्या हस्ते करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्तावीक ग्रीन रायडर शो-रूमचे मॅनेजिंग डायरेक्टर महंमद असलम यांनी केले.

त्यांनी NEMO बाईकची वैशिष्ट्ये सांगताना यामधील आकर्षक डिझाईन, कमी वीजखर्च, दीर्घ बॅटरी आयुष्य, व पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान यावर सविस्तर माहिती दिली. तसेच इलेक्ट्रिक बाईक्सकडे लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमात मुफ्ती आज़म साहब, भंते पैय्या बोधी जी, VBA जिल्हाध्यक्ष (दक्षिण) शिवा नरंगले, VBA जिल्हाध्यक्ष (उत्तर) राजेश्वर हत्तीअंबीरे, माजी महापौर अब्दुल सत्तार, VBA

महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, पुर्व उप-महापौर आनंद पाटील, पुर्व उप-महापौर शफी कुरैशी, जिल्हा महासचिव शाम कांबळे, दक्षिण तालुकाध्यक्ष विनायक गजभारे कॉंग्रेसचे दिपक हुजुरीया, यादव जी यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या गरजेवर भर दिला आणि जॉय ई-बाईकच्या उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानण्यात आले.

ग्राहकांसाठी कंपनीकडून काही विशेष ऑफर्सचीही माहिती देण्यात आली.ग्रीन रायडरच्या वतीने सांगण्यात आले की, आगामी काळात आणखी काही नवीन मॉडेल्स बाजारात आणण्याचा मानस असून नांदेडमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल.