
नांदेड टुडे:17,sep, 2025मागील दोन वर्षांपासून शासनाकडून पूरग्रस्तांना मिळणाऱ्या मदतीत मोठी दिरंगाई होत होती. 2024 सालची मदत अजूनही प्रलंबित असून यावर्षीही नांदेड शहरात व परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. मात्र शासनाकडून तातडीने मदत पोहोचली नाही. पालकमंत्री अतुल सावे यांनी पूरग्रस्त भागांना केवळ भेट देऊन औपचारिकता पूर्ण केली परंतु गेल्या वर्षीची नुकसान भरपाई मिळाली नाही असा नागरिकांचा रोष होता.

याबाबत वंचित बहुजन आघाडीने गेले वर्षभर सतत पाठपुरावा केला होता. परंतु शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद यांनी अमरण उपोषणाचा इशारा देत, दिनांक 15 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.दोन दिवसांच्या उपोषणानंतर प्रशासन हलले आणि पूरग्रस्तांच्या खात्यात मदत जमा करण्यास सुरुवात केली.

प्रशासनाने येत्या 27 सप्टेंबरपर्यंत सर्व पूरग्रस्तांच्या खात्यात मदत जमा होईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर फारुख अहमद यांनी आपले उपोषण मागे घेतले. तरीही जर आश्वासन पूर्ण झाले नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनास एसडीपीआय, कॉंग्रेस, रिपब्लिकन सेना, सिटु कामगार संगठना व सिपीएम, टायगर ऑटो यूनियन, माईनॉरीटी मिडिया असोसिएशन, ब्लैक पैंथर संगठना, मुव्हमेंट फॉर पीस एंड जस्टिस (एमपीजे), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, समाजवादी पार्टी, अल-सहारा फाऊंडेशन सहीत अनेक पक्ष व संगठनांनी पाठिंबा दिला.या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे राज्य समीती सदस्य अविनाश भोसीकर, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, माजी जिल्हाध्यक्ष इंजी. प्रशांत इंगोले,

माजी नगरसेवक सय्यद जानीभाई, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते कैलास वाघमारे, महासचिव श्याम कांबळे, महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, महानगर महासचिव मोहम्मद कासीम व अमृत नरंगलकर, कायदेशीर सल्लागार ॲड शेख बिलाल, जिल्हा उपाध्यक्ष रवी पंडित, भीमराव बेंद्रीकर, प्रवक्ते संजय टिके, संघटक डॉ. रामचंद्र वन्नजे, कोशाध्यक्ष अशोक मगरे, तालुका अध्यक्ष विनायक गजभारे, महानगराध्यक्ष अयुब खान, युवा जिल्हा कार्याध्यक्ष सुदर्शन कांचनगीरे व शहाबोद्यीन पठाण, महानगर अध्यक्ष गोपाल सिंह टाक,

राहुल सोनसळे, विशाल एडके, मोसीन भाई, शुध्दोधन कापसीकर, साहेबराव भंडारे, सादिक बाचोटीकर, अतिख लीडर, इम्रान सोनार, अब्दुस समी, शहाबुद्दीन पठाण, सय्यद बासीत, सय्यद अशफाक, सरफराज अहेमद, मुश्ताक पठाण, शुक्लोधन गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व अनेक शुभचिंतकांनी साथ दिली.पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या या लढ्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. मात्र आश्वासन प्रत्यक्षात उतरले नाही, तर पुन्हा मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा वंचित तर्फे देण्यात आला आहे.

More Stories
ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन की पहल से नांदेड के बाबुल गांव मे लेबर कामगारों की घरगुती वस्तु किट अवैध तरीखे से रखने का पर्दा फाश,72 घंटे के बाद भी कामगार उपायुक्त की ओर से पोलिस मे FIR क्यू नही ?
मौलाना मुहम्मद हुजैफा गुलाम वस्तानवी का नांदेड़ दौरा, एडवोकेट कासिम वसीम बाबू सेठ के कार्यालय में जोरदार स्वागत.!
नांदेड येथील प्रसिद्ध समाजसेवक अनवर अहेमद यांची शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या नांदेड जिल्हाप्रमुख पदी निवड