NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

DLSA NANDED: जिल्हा न्यायालयात योगा दिन मोठया उत्साहात साजरा.!

NANDED TODAY (Naeem Khan)
नांदेड, दि. 23 जून :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल गं. वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात 21 जून 2025 रोजी सकाळी 7 वा. जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये जिल्हा अभिवक्ता संघाचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. एच.आर.जाधव तथा रिटेनर लॉयर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे योग प्रशिक्षक होते. त्यांनी योगा मधील विविध आसनाची माहिती दिली. त्यामध्ये समस्थी, उर्ध्व हस्तासन, उत्तानासन, अर्ध उत्तानासन, उत्थिता अश्व संचलासन, चतुरंग दंडासन, उर्ध्वमुख, अधोमुख, उत्थिता अश्व संचलनासन शवासन, मकरासन तसेच अनुलोम, विलोम व कपाळभाती, अशा विविध आसना विषयी माहिती व प्रशिक्षण देवुन त्यांचे उपयोग सांगितले.

या कार्यक्रमामध्ये जिल्हा न्यायालय येथील अधिकारी, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश, न्याय रक्षक कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद जी. देशपांडे यांनी करुन योगाचे जीवनामधील महत्व विशद केले. रामेश्वर गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास एकुण 80 ते 100 लोक उपस्थित होते.