NANDED BJP: महावितरण कार्यालयावर भाजपाचा हल्लाबोल – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Dialy News > NANDED BJP: महावितरण कार्यालयावर भाजपाचा हल्लाबोल

NANDED BJP: महावितरण कार्यालयावर भाजपाचा हल्लाबोल

Spread the love

NANDED TODAY: 5,Feb,2021 नांदेड (प्रतिनिधी) – महावितरण कंपनीच्या धोरणाविरोधात आज महानगर जिल्ह्यात सहा ठिकाणी महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल करत कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. शहरातील नवा मोंढा येथील महावितरणच्या कार्यालयासमोर भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. भाजपा पदाधिकारी, कार्यकत्यार्र्ंना पोलिसांनी मज्जाव केला असता झटापटी नंतर गनिमी काव्याने आतील गेटला टाळे ठोकुन निषेध व्यक्त केला.महावितरण कार्यालयासमोर एक तास भाजप कार्यकर्त्यांनी महावितरण व आघाडी शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर प्रास्ताविक करताना आंदोलन करण्यामागची भूमिका विशद केली. महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी आपल्या भाषणातून आघाडी शासनाच्या बोलघेवडेपणाचा पर्दाफाश करून यापुढे नांदेड शहरात कोणाचेही विद्युत कनेक्शन कट केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. माजी जिल्हाध्यक्ष अरविंद भारतीया, प्रदेश कार्यकारणी महिला मोर्चा सदस्य डॉ. शितल भालके, जिल्हा उपाध्यक्ष सुशील चव्हाण, ओबीसी मोर्चा अध्यक्ष व्यंकटेश जिंदम यांनी समयोचित भाषणे केली. महावितरणच्या निषेधार्थ गणेश नामोळे याने मुंडन करुन निषेध व्यक्त केला. तर महिला मोर्चाच्या सर्व सदस्यांनी काळे कपडे घालून वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.विद्युत भवन समोरील आंदोलनात सरचिटणीस विजय गंभीरे,अशोक पाटील धनेगावकर, दिलीपसिंघ सोडी, कुणाल गजभारे, संदीप कर्‍हाळे, बागड्या यादव, नवल पोकर्णा, शततारका पांढरे, महादेवी मठपती, नलीनी जोशी, अनिल जगताप, मारोती वाघ, अनूराधा गीरम, राज यादव, अक्षय अमिलकंठवार, सुनिल पाटील, मनोज जाधव, संजय जालनेकर , संजय अंभोरे, श्रीराज चक्रावार, सिध्दार्थ कसबे, कामाची सरोदे, संभाजी साखरे, विलास दगडू, राजेश ठाकूर, दिपक चौधरी, संदिप छपरवाल, अरूण देव, सागर जोशी, कार्तीक दगडू, मनोज संमुंदर, संतोष गुजरे, अंबादास जोशी, अनिल गाजुळा, मंगेश चिखलीकर. विशाल शुक्ला  किरणमोरेहे सहभागी झाले होते.बर्की चौक येथे झालेल्या अंदोलनात प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख,बालाजी गिरगावकर , महेश खोमणे, भालचंद्र पत्की, अकबर खान पठाण, ओम बंडेवार,अमोल कुल्थिया, राजेश कपूर, आनंद बामलवा, सुजित कबरा, सोनू उपाध्याय,मुरली गजभारे, भाजपा पादाधिकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.तरोडा नाका येथील जंगमवाडी महावितरण कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात  मिलिंद देशमुख ,बंडू पावडे, आशिष नेरळकर, संतोष क्षिरसागर, प्रतापराव पावडे, आनंद पावडे संतोष परळीकर, संदीप पावडे,वाकोडिकर, भारत पाटील, साईनाथ कुट्टेकर, पुरुषोत्तम गाजरे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.

Total Page Visits: 280 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top