
NANDED TODAY: 13,August,2021 – आंध्रप्रदेश राज्यातील श्री तिरूपती बालाजी देवस्थानचे जागतिक पातळीवर अनन्य साधारण महत्व आहे. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातून हजारो भाविक तिथे जात असतात.
Munna helicopter: मुस्लिम समुदाय में एक तरफ मुन्ना के हेलिकॉप्टर बानाने की ख़ुशी थी लेकिन मुन्ना की मौत के वीडियो से महाराष्ट्र समेत राष्ट्रिय अंतराष्ट्रीय लोगों को मुन्ना की मौत का दुःख पहोंचा!مروحية مونا: كان الجالية المسلمة سعيدة ببناء مروحية مونا ، لكن مقطع فيديو وفاة مونا جعل المواطنين الدوليين بما فيهم ماهاراشترا حزينين على وفاة مونا!منا ہیلی کاپٹر: مسلم کمیونٹی منا کے ہیلی کاپٹر کی تعمیر پر خوش تھی ، لیکن منا کی موت کی ویڈیو نے مہاراشٹر سمیت قومی بین الاقوامی لوگوں کو منا کی موت پر دکھ پہنچایا!
तिरूपतीला जाण्यासाठी नांदेडहून विमानसेवा असावी अशी मागणी भाविकांची होती. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण मोठ्या प्रयत्नात होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता नांदेड – तिरूपती व्हाया हैदराबाद ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.

नांदेड येथे गुरू-ता-गद्दीच्या काळात 2008 मध्ये श्री गुरूगोविंदसिंघजी विमानतळाची उभारणी करण्यात आली. या विमानतळावर नाईट लँडींगची सुविधा उपलब्ध आहे. सध्या नांदेड शहर हे मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अमृतसर, कोल्हापूर या महानगरांशी विमानाने जोडले आहे.
यात आता तिरूपतीची भर पडली आहे. नांदेडहून तिरूपतीकडे जाणाऱ्या भाविकांची थेट विमानसेवेची मागणी अनेक दिवसांपासून होती. यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ट्रुजेट विमान कंपनीशी अनेकदा चर्चा केली होती.

त्याचीच फलश्रृती म्हणून सध्या सुरु असलेल्या विमानसेवेचा विस्तार करत ती आता तिरूपतीपर्यंत वाढविण्यात आली आहे. मंगळवार, बुधवार, गुरूवार या दिवशी हे विमान तिरूपती- हैदराबाद-नांदेड-मुंबई – कोल्हापूर असा प्रवास करून त्याच दिवशी त्याच मार्गाने परतीच्या प्रवासासाठी तिरूपतीकडे निघणार आहे.

सदरील तीन दिवशी सायंकाळी 6.10 मिनिटाला हे विमान नांदेड येथून निघून रात्री 9.10 मिनिटाला ते तिरूपती येथे पोहोचेल. तर तिरूपतीहून याच दिवशी सकाळी 7.05 वाजता तिरूपतीहून निघणारे हे विमान नांदेडला सकाळी 10.25 मिनिटाला पोहचणार आहे.
त्यानंतर मुंबई – कोल्हापूरसाठी आकाशात झेपावणार आहे. यामुळे भाविकांची मोठी सोय झाली आहे. या विमानाचे किमान भाडे 3,999 रुपये आकारण्यात आले. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.