
NANDED TODAY:25,Feb,2021 नायगाव प्रतिनिधी : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने नरसी येथे दि.२६ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत चावडी मेळावा होणार होता परंतु राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने सदरचा चावडी मेळावा कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात आला असून लवकरच पुढील कार्यक्रमाची तारीख कळविण्यात येईल असे एसबीआयच्या वतीने कळविण्यात आले आहे एसबीआयच्या वतीने नरसी येथे बॅंके संदर्भात
विविध योजनांची माहिती व विविध कर्ज व अन्य बाबतीत ग्राहकांना सुविधा मिळावी म्हणून त्या त्या विषयातील टेबल लावण्यात येणार होते परंतु राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभाव लक्षात घेऊन कोरोना महामारीची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नरसी येथील चावडी वाचन मेळावा रद्द करून पुढे ढकलण्यात आला असून लवकरच सदर कार्यक्रमाची तारीख कळविण्यात येईल असे एसबीआयच्या वतीने कळविण्यात आले आहे कोवीड १९ महामारीच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असून जनतेनी कोरोनापासून सावध राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे