
नांदेड- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. ३० जानेवारी २०२४ मंगळवार रोजी सकाळी ठिक ११ वाजता श्री गुरुदत्त प्रतिष्ठाण नांदेड संचलित नांदेड रुरल डेंटल कॉलेज ऍण्ड रिसर्च सेंटर नांदेड व राज्य परिवहन नांदेड आगार यांच्या संयुक्त विद्यमाने आगारातील कामगार- कर्मचार्यांसाठी मौखिक आरोग्य तपासणी व समुपदेशन शिबीर घेण्यात आले. या शिबीरात ६० कामगार- कर्मचार्यांनी तपासणी करुन घेऊन उत्तम असा प्रतिसाद दिला.

सर्वप्रथम बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. तद्नंतर शिबीरातील सर्व डॉक्टरांचे आगाराच्यावतीने गुणवंत एच. मिसलवाड यांनी पुष्पहाराने हृदय सत्कार केला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिबीरातील आरोग्य पथकाचे प्रमुख डॉ. वेदांत कदम, डॉ. प्रसाद जोहारे,

अंतरवासियताचे नऊ डॉक्टर, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, वाहतुक नियंत्रक राजेंद्रसिंघ चावला, राजेश कांबळे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वरिष्ठ लिपीक नितीन मांजरमकर, रेखा माचीनवार, सुनीता हुंबे, योगीता सुवर्णकार, वैशाली कोकणे, संतोष देवकांबळे, तिरुपती लुंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश कांबळे यांनी मांडले. या शिबीराला आगारातील कामगार- कर्मचारी बंधु- भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More Stories
ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन की पहल से नांदेड के बाबुल गांव मे लेबर कामगारों की घरगुती वस्तु किट अवैध तरीखे से रखने का पर्दा फाश,72 घंटे के बाद भी कामगार उपायुक्त की ओर से पोलिस मे FIR क्यू नही ?
मौलाना मुहम्मद हुजैफा गुलाम वस्तानवी का नांदेड़ दौरा, एडवोकेट कासिम वसीम बाबू सेठ के कार्यालय में जोरदार स्वागत.!
नांदेड येथील प्रसिद्ध समाजसेवक अनवर अहेमद यांची शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या नांदेड जिल्हाप्रमुख पदी निवड