
ना. दादा भुसे : कुंभार समाजाच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचा सत्कार
NANDED TODAY IGATPURI: दिनांक 24, मार्च, 2025 (मनोज पंडित)कुंभार समाजाच्या काका कुंभार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात येईल, तसेच काही दिवसांतच हे महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करू,

असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले.महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेच्यावतीने श्री लक्ष्मी बैंक्वेट हॉल येथे राज्यस्तरीय मेळावा आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश दरेकर यांच्यासहठावा व महाराष्ट्र प्रशनव्यासपीठावर खा. राजाभाऊ वाजे, खा. भास्कर भगरे, माजी आमदार अनिल कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, अजय बोरस्ते, उद्योजक सुरेश कोते, संजय रुईकर, सेवानिवृत्त मनपा उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर, सोमनाथ सोनवणे, अनिल आहेर,रंगनाथ सूर्यवंशी,

अनंत कुंभार, रामदास बोरसे, अतुल जगदाळे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते संस्थेचे नूतन अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर तसेच सोमनाथ सोनवणे, पुंडलिक सोनवणे, भरत शिरसाठ, के. के. चव्हाण, जगदीश मोरे, बाळासाहेबजोर्वेकर, रमेश राजापुरे, गंगाधर जोर्वेकर आदी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्तविक रमाकांत क्षीरसागर यांनी केले. सोमनाथ सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन पुंडलिक सोनवणे
आणि सविता जगदाळे यांनी केले. शहराध्यक्ष गणेश आहेर यांनी आभार मानले. यावेळी अनिल आहेर, अशोक जाधव, डॉ. जितेंद्र भालेराव, राधेशाम गायकवाड, रमेश गायकवाड, रमेश राजापूरे, शकुंतला जाधव, कांचन बोरसे, सुवर्णा जाधव, अरविंद क्षीरसागर, वसंत गाडेकर, जगदीश चित्ते, डॉ. अर्चना भालेराव, जगदीश मोरे,पत्रकार युवराज राजापुरे. शकुंतला जोर्वेकर, सुधाकर सोनवणे आदी उपस्थित होते.

More Stories
रऊफ जमींदार की पहल से नांदेड मालटेकड़ी ब्रिज दूरुस्ती कार्य के लिए 53 लाख रुपये का बजट मंज़ूर!
ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन की पहल से नांदेड के बाबुल गांव मे लेबर कामगारों की घरगुती वस्तु किट अवैध तरीखे से रखने का पर्दा फाश,72 घंटे के बाद भी कामगार उपायुक्त की ओर से पोलिस मे FIR क्यू नही ?
मौलाना मुहम्मद हुजैफा गुलाम वस्तानवी का नांदेड़ दौरा, एडवोकेट कासिम वसीम बाबू सेठ के कार्यालय में जोरदार स्वागत.!