
NANDED TODAY:23,Sep,2021 नांदेड- मुसळधार पडलेल्या पावसामुळे नांदेड उत्तर मतदार संघातील रस्त्यावरील पुलांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. नागरिकांना ये -जा करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.
नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन पडझड झालेल्या पुलांची पाहणी केली असून, महिन्याभरात नवीन पुलांचे काम व पडझड झालेल्या पुलांची दुरुस्ती करण्याबाबत सूचना केल्या आहेत.
यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस.बी. निरमीटवार व अभियंता ओ. बी. तुपकरी हे उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पुरामुळे अनेक रस्त्यावरील पुलांचे नुकसान झाले आहे. नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन
नांदेड उत्तर मतदारसंघातील वाघी ते सुगाव रस्त्यावरील पुल, वाघी ते वाघी तांडा- नाळेश्वर रस्त्यावरील पूल, वाघी ते सायाळ रस्त्यावरील दर्ग्याजवळील पूल, नाळेश्वर कळमुला रस्ता
(परभणीकडे जिल्हा सीमेलगत) चा पूल, वाघी ते वाणेगाव रस्त्यावरील पूल, सुगाव ते कोटीतीर्थ रस्त्यावरील पूल, नाळेश्वर चौकातील नळीचा पूल, नाळेश्वर ते ढोकी रस्त्यावरील पूल यासह आदी पुलांची पाहणी केली आहे.
मुसळधार पडलेल्या पावसामुळे पुलांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रहदारी करण्यास अडचण निर्माण होत आहे. यामुळे नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी प्रत्यक्ष जाऊन पुलांची पाहणी केली आहे.

पडझड झालेल्या पुलामुळे नागरिकांना रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. आशा पुलांची तात्काळ दुरुस्ती करून घेण्याबाबत सूचना केल्या आहेत.
तसेच यातील काही पुले यापूर्वीच नव्याने बांधकाम करण्यासाठी मंजूर देखील झालेली आहेत.
मंजूर असलेली पुले पावसाळा संपताच कामाला सुरुवात करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. तसेच यावेळी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी
जिल्हाधिकारी यांच्याशी फोन लावून अतिवृष्टीमुळे पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे कळविले आहे. त्यावर जिल्हाधिकारी यांनी नांदेड उत्तर मतदार संघासाठी अतिवृष्टी अंतर्गत

आलेल्या निधीमधून लवकरात लवकर कामे करून घेणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांच्यासोबत बाबुराव वाघ, संतोष भारसावडे, पांडुरंग शिंदे, धनंजय पावडे, दीपक भोसले,
कामाजी भोसले, हरिभाऊ भोसले, बळीराम डाकोरे, व्यंकटराव जानकर, केशवराव चपाट, गजानन वाघ, भारत पांडे, बालाजीराव वाघ यांच्यासह नाळेश्वर, ढोकी, वाघी, सुगाव येथील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.