अनु. जाती-जमाती, इतर मागासवर्गीय अधिकारी- कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबईच्या राज्य सचिवपदी दिनानाथ जोंधळे तर लातूर विभागीय अध्यक्षपदी सुरेश आरगुलवार यांची निवड – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > अनु. जाती-जमाती, इतर मागासवर्गीय अधिकारी- कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबईच्या राज्य सचिवपदी दिनानाथ जोंधळे तर लातूर विभागीय अध्यक्षपदी सुरेश आरगुलवार यांची निवड

अनु. जाती-जमाती, इतर मागासवर्गीय अधिकारी- कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबईच्या राज्य सचिवपदी दिनानाथ जोंधळे तर लातूर विभागीय अध्यक्षपदी सुरेश आरगुलवार यांची निवड

Spread the love

NANDED TODAY:18,Feb,2021 नांदेड- भारत वानखेडे प्रणित अनुसूचित जाती- जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई या संघटनेच्या राज्य सचिवपदी नांदेडचे दिनानाथ जोंधळे यांची तर लातूर विभागीय अध्यक्षपदी सुरेश आरगुलवार यांची निवड करण्यात आली आहे.


संघटनेचे राज्याध्यक्ष भारत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृह अकोला येथे विदर्भीय संघटनेचे अध्यक्ष सुनिल तायडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मराठवाड्यातील व विदर्भातील पदाधिकार्‍यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. संघअनेचे राज्य महासचिव डॉ. उत्तमराव सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत नांदेड जिल्हा जि.प. आरोग्य विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी सुनिल वाघमारे यांची, उपाध्यक्षपदी संजय खुने, कार्याध्यक्षपदी रवि कुंटूरवार यांची निवड करण्यात आली.

लातूर विभागीय महासचिवपदी मल्हारराव तोटरे उपाध्यक्षपदी बालाजी बागल, कार्याध्यक्षपदी संजय चिरमुले, विदर्भ विभागीय सदस्यपदी रवि पोथारे, विनेश शेवाळे यांची महासचिवपदी रावसाहेब जटाळे यांची विदर्भ सचिवपदी, शैलेश जांभुळकर यांची विभागीय सदस्यपदी निवड करण्यात आली. संघटनेच्या महिला विभागाच्या राज्य महासचिवपदी सौ. पुजा तायडे यांची निवड करण्यात आली. मराठवाड्यातील व विदर्भातील कास्ट्राईब संघटनेचे अनेक पदाधिकारी लवकरच भारत वानखेडे यांच्या नेतृत्वातील अनु. जाती- जमाती, इतर मागासवर्गीय अधिकारी- कर्मचारी संघटना, मंत्रालय मुंबई या संघटनेत जाहीर करणार असल्याचे राज्य महासचिव डॉ. उत्तमराव सोनकांबळे यांनी सांगितले.


राज्यातील मागासवर्गीय, अधिकारी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्‍नांसाठी संघटना मंत्रालय स्तरावरुन तात्काळ सोडवणार असल्याचा आशावाद संघटनेचे राज्याध्यक्ष भारत वानखेडे यांनी व्यक्त केला. यावेळी संघटना सभासद नोंदणीचा प्रारंभ करुन राज्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी संघटनेचे सक्रिय सभासद व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विदर्भ संघटनेचे अध्यक्ष सुनिल तायडे यांनी सुरेख नियोजन करुन आभार मानले.

Total Page Visits: 881 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top