
NANDED TODAY: 27,Feb,2021 ( Naeem Khan ) नांदेड टुडे कि ओर से नांदेड मुंबई हवाई सेवा न्यूज़ के उप्लक्ष मे हेमंत पाटील दुवारा 25 फरवरी को भेजे गए ईमेल के माध्यम से नांदेड़ टुडे की ओर से न्यूज़ प्रकाशित कर उसे सोशल मीडिया के माध्यम से प्रकशित किया गया था परंतु कांग्रेस के कुछ सोशल मीडिया के कार्यकर्ताओं ने हिंगोली के खासदार हेमंत पाटिल की न्यूज़ पढ़कर कहा के नांदेड़ मुंबई हवाई सेवा अशोक राव चव्हाण ने शुरू की थी!
नांदेड़ में कुछ पत्रकारों दुवारा अशोक चव्हाण के यश की खबरे तस्वीरों के साथ प्रकाशित की गई है तो वही दूसरी ओर नांदेड मुंबई हवाई सेवा खासदार हेमंत पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश जैसी खबरे प्रकशित हो चुकी है!
नांदेड़ के अनेक नागरिकों ने नांदेड़ टुडे से प्रश्न किया है के : अशोक सांगते मी केले हेमंत सांगते मी केले..! मोठा प्रश्न नांदेड मुंबई विमान सेवाला कोणाचा यश..?
आता मुंबईला दररोज विमान सेवा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
नांदेड विमानसेवेनी जळगाव व अहमदाबादला जोडल्या जाणार
नांदेड,दि.23-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विमानांच्या फेर्यांमध्ये एका बाजूस कपात सुरु असताना नांदेडहून मात्र आता दररोज विमानाने मुंबईला जाता येणार आहे. या सोबतच नांदेड शहर हवाई मार्गाने जळगाव आणि अहमदाबादला 2 मार्च पासून जोडल्या जाईल. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे नांदेडला नव्याने ही विमानसेवा सुरु होणार आहे.
नांदेड येथे उत्तम दर्जाचे विमानतळ असून या विमानतळावर नाईट लँडीगची सुविधा उपलब्ध आहे. येथील गुरुद्वारामुळे जगभरातील भाविक मोठया प्रमाणात नांदेडला येत असतात. यापूर्वी नांदेडहून मुंबई,हैद्राबाद, नागपूर, दिल्ली आदी ठिकाणी विमानसेवा सुरु होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीकाळ विमानसेवा पूर्णतः खंडित केल्यानंतर ट्रुजेट या कंपनीने हैद्राबाद-नांदेड-मुंबई व मुंबई-नांदेड-हैद्राबाद ही परतीची सेवा असलेली मंगळवार, बुधवार, गुरुवार या आठवड्यातील तीन दिवसांसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली.
नांदेडमधील हवाई प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेवून मुंबईला जाण्यासाठी दररोज विमान असले पाहिजे अशी आग्रही भूमिका पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घेतली. त्यांच्याच पुढाकारातून आता आठवड्यातील उर्वरित चार दिवसी म्हणजेच सोमवार, शुक्रवसार, शनिवार व रविवार या दिवसीही नांदेडकरांना विमानाने मुंबईला जाता येणार आहे. चार दिवस नव्याने सुरु होणार्या या विमानाने नांदेडच्या प्रवाशांना जळगाव आणि अहमदाबाद असाही प्रवास करता येणार आहे.
या पूर्वी सुरु असलेली ट्रुजेटची आठवड्यातील तीन दिवसांची विमानसेवा तशीच राहणार असून उर्वरित चार दिवसात ट्रुजेटचे विमान सकाळी 9.45 वाजता अहमदाबादहून निघून जळगावला 11.5 मिनीटाला पोहोंचणार आहे. 11.30 मिनिटानी जळगावहून निघून हे विमान 12.45 मिनिटाला मुंबईला पोहोंचेल. मुंबईहून 1.25 मिनिटाला निघणारे हे विमान नांदेड येथे 3 वाजता येईल.
नांदेड येथून 3.30 मिनिटांनी हे विमान मुंबईकडे रवाना होईल. मुंबई विमानतळावर 5 वाजता पोहोंचून 5.30 वाजता जळगावांकडे उड्डान करेल. 7.05 वाजता जळगावहून निघून रात्री 8.25 मिनिटाला अहमदाबाद येथे विमान पोहोंचेल.या नव्याने सुरु होणार्या विमानसेवेमुळे दररोज मुंबईला जाण्यासाठी सेवा उपलब्ध होणार आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून ही विमानसेवा सुरु होणार असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नांदेड -मुंबई विमानसेवा दररोज ; खासदार हेमंत पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
नांदेड / हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी करण्यात आलेली नांदेड -मुंबई विमानसेवा आता दररोज सुरु राहणार असून याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मागणी केली होती त्या मागणीला यश आले असून आता नांदेड सह आजूबाजूच्या ६ जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई विमानसेवेची व्यवस्था होणार आहे . २ मार्चपासून या विमानसेवेचा सुरवात जळगाव आणि अहमदाबाद मार्गे होणार आहे .
शीख धर्मियांचे पवित्र ठिकाण म्हणून नांदेड जगभर परिचित आहे. त्यामुळे जगभरातून भाविक नांदेड मध्ये दर्शनासाठी येत असतात. रेल्वे सोबतच , विमानसेवा सुद्धा परिपूर्ण असावी याकरिता नांदेड मध्ये अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे विमानतळ तयार करण्यात आले आहे . याठिकाणी रात्री सुद्धा विमान ये -जा करण्याची सूविधा आहे . खासदार हेमंत पाटील यांनी यापूर्वी सुद्धा नांदेड येथील विमानतळावरून दिल्ली - नांदेड - अमृतसर विमानसेवा, आणि मालवाहक विमानसेवा सुरु करण्याबाबत केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन मागणी केली होती.
त्यांनतर सुरु झालेली विमानसेवा मध्यंतरी देशात आलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शिथिल करण्यात आली होती .कालांतराने सर्व सेवा पूर्ववत झाल्यांवर नांदेड,हैद्राबाद,नागपूर आदी ठिकाणी विमानसेवा सुरु करण्यात आली. मुंबईकरिता सुद्धा आठवड्यातून मंगळवार, बुधवार, आणि गुरुवार या दिवशी सेवा सुरु होती . परंतु नांदेड मधील हवाई प्रवाशांची संख्या लक्षात घेता.
मुंबईला जाण्यासाठी दररोज विमानसेवा असावी या मागणीकरिता खासदार हेमंत पाटील आग्रही होते . याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर आता मुंबई करिता आठवड्यातील उर्वरित सोमवार , शुक्रवार, शनिवार, व रविवार या चार दिवशी विमानसेवा सुरू करण्यात आली. येत्या २ मार्च पासून या सेवेचा शुभारंभ होणार असून सोबत जळगाव आणि अहमदाबाद मार्गे प्रवास करता येणार आहे . देशभरात सुसज्ज विमानसेवा देणारी ट्रूटेज हि कंपनीचं
आठवाड्यातील पुढील चार दिवस विमानसेवा देणार आहे . सकाळी ९. ४५ वाजता अहमदाबाहून विमान निघून जळगावला ११. ५ मिनिटांला पोहचेल ११. ३० मिनिटांनी जळगावहून निघून १२. ४५ मिनिटांनी मुंबईला पोहचेल मुंबईहून १. २५ मिनिटांनी निघालेले हे विमान नांदेड येथे ३. ०० वाजता येईल नांदेड येथून ३. ३० मिनिटांनी हे विमान मुंबईकडे रवाना होईल मुंबई विमानतळावर ५ वाजता पोहोचून ५. ३० वाजता जळगावकडे उड्डाण करेल ७.०५ वाजता जळगावहून निघून रात्री ८. २५ मिनिटांनी अहमदाबाद येथे पोहचेल. या विमानसेवेमुळे नांदेडसह हिंगोली , यवतमाळ , लातूर, परभणी,बीड आणि आंध्रप्रदेश मधील निझामाबाद या पाच जिल्ह्यातील नागरिकांना या सेवेचा लाभ होणार आहे