आमदार कल्याणकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अवजारे वाटप.! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > आमदार कल्याणकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अवजारे वाटप.!

आमदार कल्याणकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अवजारे वाटप.!

Spread the love

NANDED TODAY:26,Sep,2021 नांदेड प्रतिनिधी वडवणा येथे तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने व सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायणराव कदम यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर व शेती अवजारे वाटप व तसेच ई पीक नोंदणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. बालाजीराव कल्याणकर तसेच प्रमुख मार्गदर्शक जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार किरण अंबेकर, जि. प. सदस्य साहेबराव धनगे,

बालाजीराव सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सिद्धनाथ मोकळे,प्रकाश पाटील,सतिश सावंत आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे यांनी तर सुत्रसंचालन किशोर नरवाडे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत महा डीबीटी पोर्टल वरील लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने वडवणा येथे ट्रॅक्टर व कृषी अवजारे यांचा लोकार्पण सोहळा आ.बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते आयोजित केला होता.

याप्रसंगी जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले की मी आपल्या सेवेसाठी तत्पर असून पूर्ण वेळ आपल्यासाठी काम करत आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत राहील. तहसीलदार अंबेकर यांनी ई पीक नोंदणी बदल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी अध्यक्षीय समारोपा मध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अवजारे तसेच पिक विमा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले.

या कार्यक्रमास नांदेड तालुक्यातील सरपंच देविदास सरोदे,वैजनाथ सूर्यवंशी हनुमान चंदेल, बालाजी पोपळे, सचिन पाटील,रोहिदास हिंगोले, गजानन कदम,घनश्याम सूर्यवंशी,विश्वास कदम रतन भालेराव,परमेश्वर पाटील,कमलेश कदम,

प्रल्हाद जोगदंड,होनाजी जामगे,संतोष भारसावडे,गणेशराव बोखारे,गणेशराव शिंदे बाबासाहेब जोगदंड व तालुक्यातील व गावकरी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी ईरबाजी कदम, संतोष कदम, गोविंद कोकाटे, पांडुरंग कदम संजय पोहरे ,नागोराव कदम मारोती कदम व सर्व गावकरी यांनी परिश्रम घेतले.

Total Page Visits: 575 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top