
NANDED TODAY:20,Jan,2022 :- डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथील वैद्यकीय विभागाचा नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी आढावा घेतला आहे.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जमदाडे हे उपस्थित होते. लवकरच इंन्डोस्कॉपी व एम.आर.आय. मशीन रुग्णांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती, वैद्यकीय विभागाकडून आ. बालाजी कल्याणकर यांना देण्यात आली आहे.

यावेळी आ. कल्याणकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोणाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना योग्य उपचार द्यावेत तसेच इतर आजारांच्या रुग्णांना देखील योग्य काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार करावेत अशा सूचना केल्या आहेत.
सध्या नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णांना कोरोनाचे लक्षणं तिव्र नसल्यामुळे रुग्णालयात भरती होत नसले, तरी काही प्रमाणात का होईना रुग्णाल यात रुग्ण भरती होत आहेत.

तसेच इतर आजारांची देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात येतील डॉ. शंकराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती होत असतात. संपूर्ण जिल्ह्यातून याच रुग्णालयात रुग्ण येत असतात.
त्यामुळे या रुग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. येथे आल्यानंतर बाहेर कसल्याही प्रकारचे पैसे खर्च करावे लागू नये, यासाठी आपण येथे दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात.

वैद्यकिय विभागाकडून रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यावर उपचार करावेत. तसेच रुग्णालयात स्वच्छता राखावी अशा सूचना यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. जमदाडे यांना केल्या आहेत.
आ. कल्याणकर यांच्याकडे काही रुग्णांनी केलेल्या तक्रारीवरुन आ. कल्याणकर यांनी वैद्यकिय अधीकार्यांची बैठक घेतली आहे. यावेळी काही दिवसांपासून बंद असलेली एक्सरे डी.आर. मशीन देखील तात्काळ

सुरु करण्याबाबत सुचना करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या काही मशीन नव्याने येणार आहेत, त्यासाठी मी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील पाठपुरावा करणार असल्याचे सागितले आहे.