आ. बालाजी कल्याणकर यांनी महावितरण विभागाच्याअधिकाऱ्यांची घेतली बैठक शेतकऱ्यांचा खंडित केलेल्या विद्युत पुरवठा तात्काळ सुरु करा – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > आ. बालाजी कल्याणकर यांनी महावितरण विभागाच्याअधिकाऱ्यांची घेतली बैठक शेतकऱ्यांचा खंडित केलेल्या विद्युत पुरवठा तात्काळ सुरु करा

आ. बालाजी कल्याणकर यांनी महावितरण विभागाच्याअधिकाऱ्यांची घेतली बैठक शेतकऱ्यांचा खंडित केलेल्या विद्युत पुरवठा तात्काळ सुरु करा

Spread the love

NANDED TODAY:06,Dec,2021 आ. बालाजी कल्याणकर यांनी महावितरण विभागाच्याअधिकाऱ्यांची घेतली बैठक
शेतकऱ्यांचा खंडित केलेल्या विद्युत पुरवठा तात्काळ सुरु करा

नांदेड – मागील पंधरा दिवसापासून वीज बिल वसुली मोहीम महावितरण विभागाकडून राबवली जात आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात असून याबाबतच्या अनेक तक्रारी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केल्या होत्या.

आ. बालाजी कल्याणकर यांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना सवलत देऊन, 3 एच.पी. च्या पंपासाठी तीन हजार तर 5 एच.पी. च्या पंपासाठी 5000 अशा पद्धतीने वीज बिल भरून घ्या.

तसेच शेतकऱ्याचा खंडित केलेला विद्युत पुरवठा, तात्काळ सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. या बैठकीला महावितरण विभागाचे जनार्धन चव्हाण, महेश वाघमारे, अभीयंता महाजन, श्रीमती राठोड उपस्थित होत्या.

एण सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरण विभागाने हाती घेतली होती. त्यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून विद्युत पुरवठा खंडित करु दिला नव्हता.

पुन्हा पंधरा दिवसापासून शेतकऱ्यांकडून विद्युत बिल वसूल केल्या जात आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची पिके देखील हातची जात आहेत. अशा अनेक तक्रारी शेतकर्यांननी आ. बालाजी कल्याणकर यांच्याकडे केल्या आहेत.

यामुळे आ. कल्याणकर यांनी तात्काळ महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन 3 एच.पी. च्या पंपासाठी तीन हजार तर पाच एच.पी. च्या पंपासाठी 5000 अशा पद्धतीने विज बिल भरून घ्या. तसेच काही शेतकऱ्यांकडे तीन एच.पी. चा पंप आहे.

पण महावितरण विभागाकडे पाच एच.पी. चा पंप म्हणून नोंद आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड पडत आहे. महावितरण विभागाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन किती चा पंप आहे. ती शहानिशा करूनच त्यांच्याकडू विज बील भरुण घ्यावे.

यावेळी आ. कल्याणकर यांच्या सोबत शिवसेना तालुका प्रमुख जयवंत कदम, बोरगावचे सरपंच अनिल क्षिरसागर, अशोक पावडे, शिवाजी पावडे यांच्यासह आलेगाव, एकदरा, निळा येथील शेतकरी उपस्थित होते.

Total Page Visits: 1089 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top