उर्दू घर व इतर समित्यावर राष्ट्रवादीला प्रतिनिधीत्व द्या: राष्ट्रवादी शिष्टमंडळाची मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मागणी..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > उर्दू घर व इतर समित्यावर राष्ट्रवादीला प्रतिनिधीत्व द्या: राष्ट्रवादी शिष्टमंडळाची मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मागणी..!

उर्दू घर व इतर समित्यावर राष्ट्रवादीला प्रतिनिधीत्व द्या: राष्ट्रवादी शिष्टमंडळाची मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मागणी..!

Spread the love

NANDED TODAY:16,July,2021 ( Naeem Khan@ 9960606333 ) नांदेड/प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यामध्ये विविध समित्यावर काँग्रेसकडून संधी दिली जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काँग्रेसच्या धारेणाविरूद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. उर्दू घर व इतर समित्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करावी, त्यांना समित्यावर संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्याचे अल्पसंख्यांक विकास व कौशल्य मंत्री नवाब मलिक यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री पद आहे. नांदेड येथे उर्दू घर उभारण्यात आले. या उर्दू घराच्या समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक समाजाच्या एकाही मुस्लिम कार्यकर्त्यांना जाणिवपुर्वक नियुक्त केले नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. उर्दू घराच्या व इतर समित्यावर काँग्रेसकडून सापत्न वागणूक दिली जात आहे.

उर्दू घराच्या समितीवर केवळ काँग्रेसच्याच सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एका प्रकारे काँग्रेसकडून राष्ट्रवादीवर समितीच्या नियुक्तीमध्ये अन्याय सुरू आहे. हे कुठे तरी थांबायला हवे. या व इतर समित्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्याकडे या नियुक्त्यासंदर्भात यादी दिलेली आहे,

असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, युवकचे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार,उपाध्यक्ष बंटी लांडगे,सरचिटणीस गणेश तादलापूरकर, सय्यद मौला, श्रीधर नागापूरकर, कन्हैया कदम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पनाताई डोंगळीकर, सिंधुताई देशमुख, शफी उर रहेमान, सोशल मीडिया नांदेड़ उत्तर अध्यक्ष नईम खान , युनूस खान आदी जणांची उपस्थिती होती.

चौकट
काँग्रेसकडून आघाडी धर्म पाळला जात नाही -डॉ. सुनील कदम राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येवून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात आले. सत्तेमध्ये या तिन्ही पक्षाचा वाटा आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर विविध समित्यावर नियुक्ती करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रतिनिधीत्व द्यायला हवे.

पालकमंत्री झाल्यानंतर अशोक चव्हाणांनी बैठक घेतली होती. या बैठकीत जिल्हा स्तरावर तिन्ही पक्षाची समन्वय समिती स्थापन करून सगळ्यांना विविध समित्यावर संधी दिली जाईल असे सांगितले होते. परंतु त्यांचे ते आश्‍वासन हवेत विरगळले. त्यांनी समन्वय समिती स्थापनही केली नाही व तिन्ही पक्षातील राजकीय पदाधिकार्‍यांची भेटही घेतली नाही,

स्थानिक पातळीवर चव्हाणांचा समन्वय राहिला नाही. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या काँग्रेसची भुमिका राष्ट्रवादीविरोधी असल्यासारखी दिसत आहे. नांदेडमधील आमच्या पक्षातील सदस्यांना समित्यावर निवड करून संधी देणे अपेक्षीत असताना काँग्रेसकडून आघाडीचा धर्म पाळला जात नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी दिली.

Total Page Visits: 827 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top