एसटी डेपो नांदेड आगाराचे शिवराज शंकरे सेवानिवृत्त निरोप समारंभ संपन्न ..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > एसटी डेपो नांदेड आगाराचे शिवराज शंकरे सेवानिवृत्त निरोप समारंभ संपन्न ..!

एसटी डेपो नांदेड आगाराचे शिवराज शंकरे सेवानिवृत्त निरोप समारंभ संपन्न ..!

Spread the love

NANDED TODAY: 02,June,2021 नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार येथील यांत्रिकी प्रमुख कारागीर श्री शिवराज गणपती शंकरे हे वयोमानाने वयाचे ५८ वर्षे पूर्ण करुन प्रदीर्घ सेवेनंतर ३६ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याबद्दल दि. ३१ मे २०२१ सोमवार रोजी कोरोनाविषयीचे शासन नियम पाळून मर्यादीत कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण नांदेड आगाराच्या वतीने त्यांचा सपत्नीक हृदय सत्कार करुन शुभेच्छारुपी निरोप देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक मा. श्री. पुरुषोत्तम ता. व्यवहारे हे होते तर विचारपीठावर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री. दिगविजय नरंगले, संदीप गादेवाड, चार्जमान शिवसांब कारामुंगे, कामगार सेनेचे सुधीरभाऊ पटवारी, बसस्थानक प्रमुख सौ. वर्षा येरेकर, लेखाकार सतीश गुंजकर, सत्कारमूर्ती शिवराज शंकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम संयोजन समितीच्यावतीने मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड, प्रदीप घोडे, मंगेश झाडे, संदीप देशमुख यांनी सर्व मान्यवरांचा पुष्पहाराने हृदय सत्कार केला. यावेळी आगार व्यवस्थापक श्री पुरुषोत्तम व्यवहारे यांनी सेवानिवृत्त कर्मचारी श्री. शिवराज गणपती शंकरे यांचा शाल, श्रीफळ पुष्पहार स्मृतीचिन्ह व प्रशासनाच्यावतीने रोख रक्कम दोन हजार रुपये बक्षीस म्हणून देऊन सपत्नीक हृदय सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री सुधीरभाऊ पटवारी, दिगविजय नरंगले, शिवराज शंकरे, संदीप गादेवाड, सौ. महानंदा शंकरे यांची समयोचित भाषणे झाली. शेवटी अध्यक्षीय समारोप श्री. पुरुषोत्तम व्यवहारे यांनी केले, ते आपल्या भाषणात म्हणाले की, श्री शिवराज शंकरे यांनी प्रवासी सेवेमध्ये खूप मोठे चांगले योगदान दिले असून आपण सर्वच कर्मचार्‍यांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन महाराष्ट्र शासन पुरस्कार पुरस्कृत तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमुख वक्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री शंकर बेलूरकर यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री संदीप भरांडे, अमोल भालेराव, रमेश आन्येबोईनवाड, भीमराव चावरे, रघुनाथ वाघमारे, आनंद कदम कोंढेकर, रुपेश पुयड, दौलत पाटील, ओमकार शंकरे, डॉ. सुषमा शंकरे, महेश शंकरे, दिगंबर पवार, सुदर्शन शंकरे, श्रीमती मालनबी, मनोहर माळगे, कमलेश शर्मा, संदीप पवार, प्रसाद गोंदगे, सिद्धार्थ जोंधळे यांनी परिश्रम घेतले.

Total Page Visits: 761 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top