एसटी डेपो नांदेड आगाराचे चालक परशुराम सुरेवाड सेवानिवृत्त निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न ..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > एसटी डेपो नांदेड आगाराचे चालक परशुराम सुरेवाड सेवानिवृत्त निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न ..!

एसटी डेपो नांदेड आगाराचे चालक परशुराम सुरेवाड सेवानिवृत्त निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न ..!

Spread the love

NANDED TODAY:03,August,2021 नांदेड- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार येथील चालक श्री परशुराम गणपतराव सुरेवाड, चालक क्रं. १६७७९ हे वयाचे ५८ वर्षे पूर्ण करुन २९ वर्षे सेवा बजावून प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा दि. ३१ जुलै २०२१

शनिवार रोजी संपूर्ण आगाराच्यावतीने सपत्नीक हृदय सत्कार करुन शुभेच्छारुपी निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक मा. श्री. पुरुषोत्तम व्यवहारे हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध

उद्योजक श्री अमीत कंठेवाड, विश्‍वासू प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक संदीप गादेवाड, बसस्थानक प्रमुख सौ. वर्षा येरेकर, कार्गो माल वाहतुकीचे राजकुमार टिपराळे, कृषी विभागाचे प्रल्हाद सुरेवाड,

सेवानिवृत्त कर्मचारी सत्कारमूर्ती परशुराम सुरेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम संयोजन समितीच्यावतीने श्री. आतिश तोटावाड, गुणवंत एच. मिसलवाड, एम.डी. गौस, जय कांबळे, बालाजी शिंदे यांनी सर्व मान्यवरांचा पुष्पहाराने हृदय

सत्कार केला. यावेळी आगार व्यवस्थापक मा. श्री. पुरुषोत्तम व्यवहारे यांनी सेवानिवृत्त कर्मचारी सत्कारमूर्ती श्री परशुराम सुरेवाड यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, स्मृतीचिन्ह व प्रशासनाकडून रोख रक्कम २००० रुपये भेट देऊन सपत्नीक हृदय सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री अमित कंठेवाड, शंकरराव नांदेडकर,

पीएसआय. अंकुश सुरेवाड यांची समयोचित भाषणे झाली. शेवटी अध्यक्षीय समारोप पुरुषोत्तम व्यवहारे यांनी केले.

ते आपल्या भाषणात म्हणाले की, परशुराम सुरेवाड हे विनातक्रार प्रामाणिकपणे प्रवासी सेवेत मोठे योगदान दिले असून आपण सर्वांनीच त्यांचा आदर्श घेऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व

सुत्रसंचालन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त तथा सामाजिक कार्यकर्ते एसटी मेकॅनिक मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. दिलीप कदम यांनी मानले. यावेळी सुरेवाड यांचे नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी निर्दोस पवार, संतोष सुरेवाड, गोविंद सोनटक्के, व्ही.एन. कवठे, सुधाकर घुमे, लक्ष्मण देशमाने, आनंद कदम कोंडेकर, दिगंबर पवार, सौ. कल्पना मोरे, सविता निलेवाड, रेखा सुर्यवंशी, अंजू सुनपे, राजू केंद्रे, राजेंद्रसिंग

चावला, गंगाधर वाघमारे, राजेश गहीरवार, पवन चौकटे, महंमद फिरोज, दिपक मुदीराज, आकाश राठोड, मोहम्मद अली इत्यादींनी परिश्रम घेतले.

Total Page Visits: 210 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top