एसटी डेपो नांदेड आगारात एसटी लालपरीचा वर्धापन दिन साजरा..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > एसटी डेपो नांदेड आगारात एसटी लालपरीचा वर्धापन दिन साजरा..!

एसटी डेपो नांदेड आगारात एसटी लालपरीचा वर्धापन दिन साजरा..!

Spread the love

NANDED TODAY:2,June,2021 नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार येथे दि. १ जून २०२१ मंगळवार रोजी गोरगरीबांची सुरक्षित प्रवासाची जीवन वाहिनी म्हणून समजल्या जाणार्‍या एसटी बस लालपरीचा ७३ वा वर्धापन दिन कोविड-१९ चे शासन नियम पाळून मर्यादीत कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करुन आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मा. श्री. संदीप गादेवाड यांच्या हस्ते लालपरी बसचे पुष्पहार बांधून, श्रीफळ फोडून पेढे वाटून पुजन करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी चार्जमन मा. श्रीनिवास रेनके, राज्य गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त तथा सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आगार कर्मचारी श्री. विनोद हतागळे, आनंद कदम कोंडेकर, विजय सुर्यतळे, बाबुराव तरपेवाड, विजय खेडवनकर, मंगेश झाडे, विजय हापसे, सौ. श्‍वेता तेलेवार, श्रीमती मालनबाई, सुजाता वाघमारे,

गंधारबाई धुताडे हे मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. एसटी लालपरीची सुरुवात १ जून १९४८ ला होऊन पहिली बस नगर ते पुणे धावली. तिचा पुढे विस्तार होऊन आजघडीला सुरक्षित प्रवाशी सेवेमध्ये अश्‍वमेध, मानव विकास, हीरकनी, स्लीपर कोच, शिवशाही अशा विविध रंग-संगती स्वरुपाच्या बसेस सेवेमध्ये तत्पर आहेत व एसटी कर्मचारी बंधु- भगिणी उत्तम सेवा देत आहेत.

Total Page Visits: 860 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top