केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवसा निमित्त मजुरांना जेवण, लस नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्कीट वित्रण ! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवसा निमित्त मजुरांना जेवण, लस नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्कीट वित्रण !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवसा निमित्त मजुरांना जेवण, लस नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्कीट वित्रण !

Spread the love

NANDED TODAY:28,May,2021 ( News email by : Jadhav Maroti ) खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष प्रविण साले आणि धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जिल्हा चिटणीस विपूल मोळके यांच्यातर्फे परप्रांतीय मजुरांना जेवण व लस घेणाऱ्या नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्कीट देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस भाजप महानगर नांदेड तर्फे साजरा करण्यात आला.

क्रियाशील मंत्री म्हणून ओळख असणारे नितीन गडकरी यांचे देशभरात अनेक चाहते आहेत. कोरोना संक्रमणाची पार्श्वभूमी पाहता त्यांचा वाढदिवस समाज उपयोगी कामाद्वारे साजरा करण्यात आला. श्री गुरू गोविंदसिंगजी स्मारक शासकीय रुग्णालयात लस घेणाऱ्या नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्कीट वितरण करण्याचा आजचा 70 वा दिवस होता. भाजपचा दररोज एका पदाधिकाऱ्याने तर्फे हे वितरण होत असते. तिसऱ्या लॉक

डाऊनच्या काळात गरजूंना दररोज
लॉयन्सचे डबे देण्यात येतात. गुरुवारी नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त विपूल मोळके यांच्या तर्फे 100 डबे,सौ.रेखा व श्यामसुंदरराव कल्याणकर यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त 100 डबे,कै.विलासराव किशनराव देशपांडे

यांच्या वर्षश्राद्ध प्रित्यर्थ शशिकांत देशपांडे बा-हाळी ता. मुखेड यांच्यातर्फे 50 गोड जेवण तसेच रूपाली परमार यांच्यातर्फे 50 डबे वितरित करण्यात आले.डबे वितरण करण्यासाठी संयोजक दिलीप ठाकूर यांच्यासमवेत विपूल मोळके, रूपाली परमार , विक्रमसिंह परमार,अर्णव परमार,अरुणकुमार काबरा, मन्मथ स्वामी, केदार उपाध्याय, प्रशांत कळसकर यांनी परिश्रम घेतले.

Total Page Visits: 783 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top