‘कोरोनाने थांबले होते जग…पण नाही थांबले शिक्षण!’विटभट्टीवर जागतिक महिला दिन साजरा; सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा पुढाकार – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > ‘कोरोनाने थांबले होते जग…पण नाही थांबले शिक्षण!’विटभट्टीवर जागतिक महिला दिन साजरा; सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा पुढाकार

‘कोरोनाने थांबले होते जग…पण नाही थांबले शिक्षण!’विटभट्टीवर जागतिक महिला दिन साजरा; सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा पुढाकार

Spread the love

NANDED TODAY:09,March,2021 नांदेड – कोरोनामुळे संपुर्ण जगाचीच वाताहत झालेली आहे. शाळा बंद आहेत आणि मुलांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आलेले असतांना उन्हातान्हात विटभट्टीवर काम करणाऱ्या कामगार दांपत्यानी मुलीच्या शिक्षणाची हेळसांड होऊ दिली नाही. शिक्षकांनी आॅनलाईन पद्धतीने आणि आॅफलाईन शिक्षण चालू ठेवले होते.

त्याला गोरगरिबांनी जमेल तसा प्रतिसाद दिला. आताही कोरोनाचा कहर सुरुच आहे परंतु शंभर नंबरवाले वीटभट्टीचे मालक अनुरत्न वाघमारे यांनी सामाजिक सहिष्णुता जपत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन दिले आहे. याचा प्रत्यय कालच्या जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आला. कोरोनाने थांबले होते जग पण थांबले नाही शिक्षण असे प्रियंका एडके या मुलीबद्दल अनेकांनी भावना व्यक्त केल्या.

कामगार स्री पुरुषांची शारीरिक हेळसांडीबरोबरच गरिबी आणि येणाऱ्या अनेक संकटांशी झुंजच असते. वाजेगाव येथील विट कामगार मजूर सौ. रत्नमाला व सुनील एडके यांची मुलगी, कु. प्रियंका सुनील एडके ही गतवर्षीच्या पुर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्यासह उतिर्ण झाली.

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, कवी राम गायकवाड यांची उपस्थिती होती. तसेच रत्नमाला एडके व सुनील एडके या तिच्या आईवडिलांचाही सत्कार करण्यात आला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्त आटवून दारिद्र्याच्या कपाळावर नाव गोंदवणिऱ्या महिला वीटकामगार प्रिया गायकवाड, अनुसया कांबळे, उगवता भदरगे, मंगल सोनटक्के, चांगुणा एडके, आशा एडके, माया एडके, सोनी गोविंद, शितल गोविंद,

शिला सोनसळे, रोशनी गायकवाड, आकांक्षा गायकवाड या महिला व मुलींचाही सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल गायकवाड, गोविंद कांबळे, त्रीसरण भदरगे, अनिल सोनटक्के, सचिन सोनसळे, निवृत्ती एडके, सुरेश एडके, रविकिरण एडके, दीपक एडके, सतिश एडके, साहेबराव मेकाले, गोविंद गायकवाड आदी वीटकामगार स्री पुरुषांची उपस्थिती होती

Total Page Visits: 1179 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top