
NANDED TODAY:30,April,2021 नांदेड : हिंगोली लोकसभा मतदारसंघातील नांदेड जिल्ह्यातील किनवट , माहूर , हदगाव , हिमायतनगर तालुक्यातील कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेता रुग्णांना त्याच ठिकाणी ऑक्सिजन साठा उपलब्ध व्हावा याकरिता ३० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नातून मिळाले . याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली..!
नांदेड जिल्ह्यातील किनवट,माहूर, हदगाव , हिमायतनगर या तालुक्याचे अंतर नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणापासून खूप दूर आहे सध्या त्याठिकाणी कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट होत असून रुग्णांना त्याच ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध व्हावा सोबतच अत्यावश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या सोबत बैठक घेऊन
बैठकीत किनवट ,माहूर , हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यासाठी ३० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध करून मंजुरी देण्यात आली . त्यावर तात्काळ कारवाई करत किनवट साठी १० हदगाव करिता १० तर हिमायतनगर आणि माहूर करिता ५ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मंजूर करण्यात आले आहेत . कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती वाढल्यामुळे सगळीकडे ऑक्सिजन चा तुडवडा जाणवत आहे यावर उपाय म्हणून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर हा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे
हे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर हवेतून दर तासाला ५ लिटर ऑक्सिजन तयार करतात त्यामुळे ज्या ठिकाणी ऑक्सिजन समस्या जाणवते त्या ठिकाणी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर ऑक्सिजन निर्मितीचे कार्य करतात . त्यामुळेच ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरची मागणी वाढत आहे . हि गरज लक्षात घेऊन खासदार हेमंत पाटील यांनी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मिळवून दिले.