खा. चिखलीकरांचा एस.सी., एस. टी. विकास कामांसाठी ८७ लाखांचा निधी २१ गावांतील विविध विकास कामांना मिळणार चालना..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > खा. चिखलीकरांचा एस.सी., एस. टी. विकास कामांसाठी ८७ लाखांचा निधी २१ गावांतील विविध विकास कामांना मिळणार चालना..!

खा. चिखलीकरांचा एस.सी., एस. टी. विकास कामांसाठी ८७ लाखांचा निधी २१ गावांतील विविध विकास कामांना मिळणार चालना..!

Spread the love

NANDED TODAY: 2,June,2021 नांदेड : विकासासाठी सदैव तत्पर असणान्या खा. प्रतापराव पाटील पारा स्थानिक विकास कार्यक्रमाचे २१ गावांत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती विकास कामांना मंजुरी देण्यात आला असून, ८७ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाची कामे मोठ्या प्रमाणात होणार आहेत.

कोरोना महामारोच्या काळात विकासाची कामे पेड गतीने सुरू होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाच्या कामांना चालना मिळाली नाही मार्ग काढत खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्थानिक विकास कार्यक्रम २०१९-२० अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती विकास कामांना प्राधान्य दिले आहे.

या विकास कामत बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे अनुसूचित जमाती वस्तीत ५ लाख रुपयांचा सी.सी. रस्ता, तालुक्यातील लोहगाव येथे ५ लाख रूपयांचा सी.सी. रस्ता. भोकर तालुक्यातील बोरगाव येथे ५ लाख रूपयांचा सी.सी. रस्ता. बटाळा येथे ५ लाख रुपयांचा सौ. सी. रस्ता, उमरी तालुक्यातील निरोणा येथे ४ लाख रुपय सी.सी. रस्ता, नायगाव तालुक्यातील होटाळा येथे ५ लाख रुपयांचा सौ. सौ. रस्ता तर मुखेड तालुक्यातील गोनेगाव अनुसूचित जाती वस्तीत ५ लाख रूपयांचे

सांस्कृतिक सभागृह, मुखेड तालुक्यातील रावी येथे २ लाख रूपयांच सी.सी. रस्ता, देगलूर तालुक्यातील मानूर येथे लाख रुपयांचा सी.सी. रस्ता, दावणगिर येथे ३ लाख रुपयांचा सौ. सौ. रस्ता नायगाव तालुक्यातील अंतरगाव येथे सौ.सी. रस्त्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर, भोकर तालुक्यातील कोळगाव येथे ५ लाख रुपयांचा निधी मंजूर, कंधार तालुक्यातील सुंदर येथे ५ लाख रुपयांचा सी.सी. रस्ता, उमरी तालुक्यातील बोथी येथे ४ लाख रुपयांचा सी.सी. रस्ता,

नायगाव तालुक्यातील टेंभुर्णी येथे ३ लाख रुपयांचा सी.सी. रस्ता, मांजरमवाडी येथील ३ लाख रुपयांचा सी.सी. रस्ता, मांजरम येथे २ लाख ९९ हजार रुपयांचा सी.सी. रस्ता, लोहा तालुक्यातील सांगवी येथे २ लाख ५० हजार रुपयांचे सौरदिवे, बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर बसविण्यासाठी २ लाख ५० रुपये तर नायगाव तालुक्यातील टाकळगाव

येथे दलित वस्तीतील सी.सी. रस्त्याच्या विकास कामासाठी अडीच लाख रुपये असा एकूण ८७ लाख रुपयांचा निधी अनुसूचित जाती, जमाती घटकातील विविध विकास कामांच्या विकासासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मंजूर केला आहे.

याबाबत बोलतांना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, ग्रामीण भागातील विकासाच्या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नांदेड लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आणि जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखविला तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.

ग्रामीण भागातील रस्ते, पिण्याचे पाणी, पथदिवे आणि घरकुत या बाबींना विशेष प्राधान्य दिले जाईल. ग्रामीण भागाच्या शारात विकासाचे स्वप्न आम्ही पाहत आहोत. भविष्यात हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असा विश्वास खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.

Total Page Visits: 878 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top