खुरगाव हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र बनणार – राजरत्न आंबेडकर – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > खुरगाव हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र बनणार – राजरत्न आंबेडकर

खुरगाव हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र बनणार – राजरत्न आंबेडकर

Spread the love

NANDED TODAY:13,Sep,2021 ( Naeem Khan@9960606333 ) नांदेड – धम्माचा प्रसार आणि प्रचार वेगाने व्हावा यासाठी खुरगावचे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. देशभरात ज्यांना कुणाला श्रामणेर दीक्षा घ्यायची आहे, अशांना ३६५ दिवस चालणारे हे एक हक्काचे श्रामणेर केंद्र आहे.

लवकरच आपण या पवित्र भूमीला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देऊ तसेच हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र आंतरराष्ट्रीय किर्तीचे केंद्र बनणार अशी प्रांजळ भूमिका भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी तालुक्यातील खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात बोलताना मांडली.

यावेळी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो, भंते चंद्रमणी, भंते सुदर्शन यांच्यासह श्रामणेर भिक्खू संघ, धम्मसेवक गंगाधर ढवळे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, दिनेश हनमंते, वैभव धबडगे, राहुल घोडके, प्रकाश मगरे, वैभव खिल्लारे आदींची उपस्थिती होती.

भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ट्रस्टी चेअरमन राजरत्न आंबेडकर हे चार दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास सदिच्छा भेट दिली.

आंबेडकर यांचे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने स्वागत केले. राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प पूजन करण्यात आले. तसेच प्रशिक्षण केंद्र परिसरात पिंपळवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

ते बोलतांना पुढे म्हणाले की, धम्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करणं ही आता आपली जबाबदारी आहे. आपण सर्वचजण संघटित होऊन काम करु या. भिक्खू हे या चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत.

त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. उपासकांनीही अत्यंत निष्ठेने काम केले पाहिजे, याची जाणीव त्यांनी यावेळी केली. प्रास्ताविक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले तर आभार गंगाधर ढवळे यांनी मानले.

ऋषीपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसाकडून धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे आयोजन करण्यात येते.

आत्तापर्यंत दोनशेहून अधिक गावांत ही यात्रा गेली आहे. तसेच दर महिन्याच्या पौर्णिमेला खुरगाव येथे पौर्णिमोत्सव कार्यक्रम होतो. येत्या २० सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमात त्रिरत्न वंदना, धम्मदेसना, व्याखान, भोजनदान, वृक्षारोपण, बुद्ध भीम गायनसंध्या आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच अनेक विचारवंतांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

वर्षावास काळात येणाऱ्या पौर्णिमांना विशेष महत्व असते. भाद्रपद पौर्णिमेला येत्या सोमवारी शहर, जिल्हा व परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले आहे.

Total Page Visits: 691 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top