
NANDED TODAY: 09,Nov,2021 नांदेड – औरंगाबाद येथे झालेल्या महिला सरपंच परिषदेत आ. संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवकाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बेताल वक्तव्य केले होते. याचाच निषेध करत ग्रामसेवक संघटनांनी एक दिवस काम बंद आंदोलन केले.
दि.8 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या महिला सरपंच परिषेदेत आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवकांबद्दल अपमानास्पद शब्द वापरले होते. वास्तविक पाहता ग्रामसेवक संवर्गातील कर्मचारी हे गावपातळीवर शासन आणि नागरिकांचा दुवा म्हणून काम करत असतात.
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सचोटीने गावपातळीवर राबविण्यासाठी ते काम करतात. असे असताना आमदार संजय शिरसाठ यांनी महिला सरपंच परिषदेत बेताल वक्तव्य करीत गमसेवकांची त्यामुळे याचा
निषेध करीत दि. 9 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी काळ्या फिती लावून जाहीर निषेध करीत एक दिवस काम बंद आंदोलन केले. तसेच आ. शिरसाठ यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी तसेच
त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही महाराष्ट्र राज्य पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष नितीन धामणे,
राज्य सचिव हरिशचंद काळे, जिल्हाध्यक्ष मधुकर मुंगल, जिल्हा सचिव सुनील पारडे, कार्याध्यक्ष कापसे, कोषाध्यक्ष श्रीवास्तव अनुप, राज्य संपर्क प्रमुख गुलाब वडजे, राज्य प्रसिद्धीप्रमुख शिवकुमार देशमुख आदींच्या स्वाक्षर्या आहेत.