
NANDED TODAY:02,Dec,2021
चोर मचाए शोर : शिवाजी चौक सिडको येथून मोबाईल चोरला…सिडको नवीन नांदेड भागातील सुपरिचित आणि माजी नगरसेवक डॉ.देवानंद जाजु यांच्या नवीन नांदेड भागातील शिवाजी चौक सिडको मुख्य रस्त्यावर असलेल्या
जाजू रुग्ण सेवालय येथून रात्री 8.00वाजताच्या दरम्यान डॉ .क्याबिन मध्ये कोणी नसल्याची संधी साधत Mobile M12 रुपए 11000/- किमतीचा नवा मोबाईल कोणी अज्ञात व्यक्तीने

चोरला असल्याची तक्रार फिर्यादी डॉ.देवानंद जाजुल यांनी दिनांक 1/11/2021रोजी गु र न 39 भादवी 379अन्वये नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.

विशेष म्हणजे डॉ. जाजू यांचा दवाखाना भरवस्तीत आणि सिडको पोलीस चौकी समोर असूनही चोरांने न भिता मोबाईल चोरला आहे या घटनेमुळे परिसरातील व्यापारी
आणि नागरिकात भीतीचे वातावरण आहे या भागात पोलिसांचा धाक आहे की नाही अशी शंका नागरिकांच्या मनात येत आहे.पोलिसांनी या प्रकरणी तातडीने पावले

उचलून चोरट्याला जेरबंद करून पुढे होणाऱ्या घटनांना पायबंद घालावा असे व्यापारी आणि नागरिकांतून मागणी होत आहे.