टिपू सुलतान ब्रिगेड धर्माबाद तालुका अध्यक्षपदी मिर्ज़ा खुर्रम पटेल यांची निवड.! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > टिपू सुलतान ब्रिगेड धर्माबाद तालुका अध्यक्षपदी मिर्ज़ा खुर्रम पटेल यांची निवड.!

टिपू सुलतान ब्रिगेड धर्माबाद तालुका अध्यक्षपदी मिर्ज़ा खुर्रम पटेल यांची निवड.!

Spread the love

NANDED TODAY:02,Sep,2021 दंगामुक्त भारत, नशामुक्त भारत, भूकबळीमुक्त भारत या अभियाना अंतर्गत सुशिक्षित, सशक्त, कर्तव्यदक्ष आणि मानवी मूल्यं जपणारी तरुण पिढी निर्माण करणे,

तसेच देश सेवा आणि मानव सेवेसाठी सदैव तत्पर असणारी युवा पिढी तयार करणे हे लक्ष्य समोर ठेवून टिपू सुलतान ब्रिगेड महाराष्ट्रात वाटचाल करीत आहे.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजनांचा बुलंद आवाज आदरणीय शेख सुभान अली सर यांच्या मार्गदर्शनात टिपू सुलतान ब्रिगेड महाराष्ट्रात उत्कृष्ट कार्य करते आहे.

बहुजन समाजाच्या आणि विशेषत: मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, समाजाच्या हक्क आणि अधिकारासाठी लढणारी टिपू सुलतान ब्रिगेडचे ही संघटना आहे.

प्रदेश अध्यक्ष डॉ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या अध्यक्षतेखाली आणि मराठवाडा उपाध्यक्ष फयाज पठाण, नांदेड (दक्षिण) जिल्हाध्यक्ष इनामदार जकरीया, नांदेड महानगराध्यक्ष सय्यद ज़मीर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे एक बैठक घेण्यात आली.

या बैठकीत टिपू सुलतान ब्रिगेड धर्माबाद तालुका अध्यक्षपदी सिरजखोड येथील एकनिष्ठ आणि समर्पित कार्यकर्ते मिर्ज़ा खुर्रम बेग यांची निवड करण्यात आली.

त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले तसेच पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.या

निवडीबद्दल नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, मिर्ज़ा गफ्फार बेग (सरपंच, सिरजखोड), नवीद अहमद, शाहरूख खान (शिवणी), फेरोज पटेल (बळेगाव), अब्दुल तौफिक (शहर उपाध्यक्ष नांदेड),

शेख शाकीर (किनवट), मोहम्मद शहबाज (मुदखेड), सय्यद शाहिद अली, मिर्ज़ा इब्राहिम बेग, मिर्ज़ा मिनहाज बेग, शेख तौफिक, शेख वसीम(धर्माबाद), शेख इरफान (बिलोली), शेख जावीद (माहूर), असद खान (हदगाव), शाकेर खान (तामसा), जुनेद अत्तार (कंधार), इ. नी अभिनंदन केले.

Total Page Visits: 605 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top