
NANDED TODAY:21,August,2021 नांदेड/ प्रतिनिधी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2021 चा इंडियन ईन्स्पायरेशन वुमन हे अवार्ड मनोविकार तज्ञ डाॅ.श्रद्धा शिवाजीराव जाधव-वकील यांना भारताच्या आयर्न किरण बेदी यांच्या हस्ते शुक्रवार दि.20 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमातून प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा हा पुरस्कार विविध क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रदान करण्यात येतो. डॉ.श्रद्धा जाधव यांनी बालमानसशास्त्र या उपचार पद्धतीत बालकांचे इंटरनेट चे व्यसन व महिलांचे मानसिक-आजार या विषयावर इंग्लंड येथे अनुबोधनात्मक शोध निबंध सादर केला आहे.

डाॅ. श्रद्धा जाधव ह्या इंडियन सायकॅक्ट्रिक सोसायटीच्या सदस्य असून त्या महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे मनोविकार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता.मुखेडचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी कै. नागोराव माधवराव जाधव, माजी खा. विठ्ठलराव जाधव, डॉ. पी. एम. जाधव यांचे कुटुंबीय उच्चशिक्षणात अग्रेसर राहिले आहेत.
तसेच शिवाजीराव नागोराव जाधव यांचे ज्येष्ठ चि. रवी शिवाजीराव जाधव हे सिडको येथील शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत तर कनिष्ठ चि.अॅड. राजीव जाधव यांनी लंडन येथे बॅरिस्टर कायदेविषयक शिक्षण पूर्ण करून दिल्ली येथे वकिली करतात .

कन्या डॉ. श्रद्धा शिवाजीराव जाधव-वकिल यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक व अभिनंदन होत असतानाच जाधव कुटुंबीयांच्या उच्च शिक्षण क्षेत्राच्या कार्यातील गौरव सर्वस्तरातून होत आहे.
