
NANDED TODAY: 25,June,2021 नांदेड-येथील डेल्टा हॉस्पीटलमधील डॉ. सुजित येवलीकर, डॉ. जयंत शिंदे, डॉ. बळीराम भुरके, डॉ. भारती मढवई या डॉक्टरांच्या टीमने कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष कोरोना रुग्णांवर योग्य उपचार करून अनेक कोरोना रुग्णांचे प्राण वाचविले.
त्यांच्या कामाची दखल घेत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीने त्यांना गौरव कार्याचा सन्मान कर्तृत्त्वाचा अंतर्गत कोवीड योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने सर्व देशभर थैमान घातले असताना नांदेड जिल्हाही त्यातून सुटला नव्हता. रोज एक हजारपार रुग्ण आढळून येत होते. त्यावेळी प्रशासनाची व खाजगी डॉक्टरांची देखील तारांबळ उडाली हाती.
दररोज नवनवीन रुग्ण भरती होत असताना बेडची कमतरता तसेच ऑक्सिजन, रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी रुग्णांची धावाधाव या सर्व विचित्र परिस्थितीत डेल्टा हॉस्पीटलमधील सर्व टीमने कोरोना रुग्णांवर योग्य उपचार करून अनेक रुग्णांचे प्राण वाचविले.
त्यांच्या या कार्याची दखल घेत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीने माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांता पाटील व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यंाच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोतलाना डॉ. सुजित येवलीकर यांनी आमच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला जो सन्मान दिला त्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे व भागवत देवसरकर यांचे मनापासून आभार मानले