देशव्यापी संपा निमित्ताने आशाकडून केंद्र सरकारचा तीव्र निषेध – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > देशव्यापी संपा निमित्ताने आशाकडून केंद्र सरकारचा तीव्र निषेध

देशव्यापी संपा निमित्ताने आशाकडून केंद्र सरकारचा तीव्र निषेध

Spread the love

NANDED TODAY:24,May,2021 – आशा व गट प्रवर्तकांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे नांदेड जिल्ह्यात शंभर टक्के संप यशस्वी करून नांदेड मध्ये तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

सिटु संलग्न आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या देशव्यापी हाके नुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व आशा व गट प्रवर्तक दिनांक २४ मे रोजी एक दिवशीय संपावर होत्या.कोविड – १९ च्या महामारी मध्ये जिवाची पर्वा न करता तुटपुंज्या

मानधनावर काम करणाऱ्या आशा व गट.ताई आपल्या विविध मागण्या घेऊन सतत रस्त्यावरची लढाई लढत आहेत परंतु त्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे शासनाने नेहमीच दुर्लक्ष केल्यामुळे आशा व गट प्रवर्तकामध्ये सरकार विरूद्ध प्रचंड नाराजी आहे.

केलेल्या कामाचा मोबदला देण्यात येत नाही तसेच अनेक आशा कोविड काळात मृत्यू झाल्याने त्यांना अद्याप पन्नास लाख रूपये विमा लागू करून अर्थसहाय्य देण्यात आले नाही.

अशा अनेक मागण्या प्रलंबित असल्यामुळे नांदेड येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
निषेध कार्यक्रमात जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार,सचिव कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.रेखा धूतडे,कॉ.द्रोपदा पाटील,कॉ.शरयू कुलकर्णी यांच्या सह अनेक आशांनी सहभाग नोंदविला.

.

Total Page Visits: 968 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top