धोंडीबा शंकर पोलावार यांच्या खून प्रकरणी दोषी अधिकार्‍यावर कार्यवाही करा -मंत्री अशोक चव्हाण – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > धोंडीबा शंकर पोलावार यांच्या खून प्रकरणी दोषी अधिकार्‍यावर कार्यवाही करा -मंत्री अशोक चव्हाण

धोंडीबा शंकर पोलावार यांच्या खून प्रकरणी दोषी अधिकार्‍यावर कार्यवाही करा -मंत्री अशोक चव्हाण

Spread the love

NANDED TODAY:11,जनवरी,2022 धोंडीबा शंकर पोलावार यांच्या खून प्रकरणी दोषी अधिकार्‍यावर कार्यवाही करा -मंत्री अशोक चव्हाण नांदेड उमरी तालुक्यातील मनूर येथील धोंडीबा शंकर पोलावार यांच्या खून प्रकरणी संबंधीत दोषी असलेल्या

अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करून कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांना देवून फरार असलेल्या दोन आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

नियोजन भवनात आढावा बैठक पार पडल्यानंतर आर्यवैश्य महासभेचे राज्य सहकोषाध्यक्ष तथा नगरसेवक संजय पांपटवार, महासभेचे राज्य उपाध्यक्ष

नंदकुमार मडगुलवार, महासभेचे जिल्हाध्यक्ष विजय कुंचनवार यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन देवून आरोपीविरूध्द कार्यवाही करण्याची मागणी

केली. याची दखल घेवून पालकमंत्री चव्हाण यांनी बैठक घेतली. बैठकीत या प्रकरणाची संपुर्ण माहिती घेतली. त्यानंतर महसूलच्या अधिकार्‍याविरूध्द कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देवून

आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलिस अधिक्षकांना दिले. मनूर येथील धोंडीबा पोलावार यांच्या खून प्रकरणात निष्काळजीपणा न करता कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेशही ना.चव्हाण यांनी दिले.

Total Page Visits: 664 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top