नांदेड शहरातील नामवंत कर सल्लागार साईप्रकाश षण्मुखम यांचे निधन झाले..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > नांदेड शहरातील नामवंत कर सल्लागार साईप्रकाश षण्मुखम यांचे निधन झाले..!

नांदेड शहरातील नामवंत कर सल्लागार साईप्रकाश षण्मुखम यांचे निधन झाले..!

Spread the love

NANDED TODAY:13,April,2021:- नांदेड शहरातील नामवंत कर सल्लागार व गोकुळनगरमधील प्रतिष्ठीत नागरिक साईप्रकाश षण्मुखम यांचे रविवार, ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता हैदराबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.ते ६३ वर्षांचे होते. षण्मुखम यांच्यावर हैदराबादमध्ये रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,२ मुले,२ भाऊ, नातू, नातवंडे असा परिवार आहे..!

पवन जोशी (सारस्वत) यांचे निधन
शहरातील सिडको येथील रहिवासी पवन नंदलाल जोशी(सारस्वत) यांचे दि. 13 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. दिनेश नंदलाल जोशी (सारस्वत) यांचे ते लहान भाऊ होते. पवन जोशी हे मृत्यू समयी वय 45 वर्षं होते.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर हैद्राबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

पार्वतीबाई बावस्कर यांचे निधन
नांदेड शहरातील प्रभात नगर येथील पार्वतीबाई निवृत्ती बावस्कर यांचे आज दि.10 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 70 वर्षांच्या होत्या.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार दिपंकर बावस्कर यांच्या त्या मातोश्री होत. पार्वतीबाई बावस्कर यांच्या पार्थिव देहावर सिडको येथील स्मशानभूमीत आज दि. 10 एप्रिल रोजी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले!

सौ.शालिनी कुलकर्णी यांचे निधन
नांदेड बालाजीनगर (पावडेवाडीरोड) येथील ज्येष्ठ महिला सौ.शालिनी संतुकराव कुलकर्णी यांचे अल्पश आजाराने शुक्रवारी दि.9 रोजी सकाळी सातच्या सुमारास खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 62 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पती,तीन मुले,सुुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सिडको स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दै.सत्यप्रभाचे उपसंपादक प्रभाकर कुलकर्णी यांच्या त्या वहिनी होत्या.

अहिल्याबाई गजभारे यांचे निधन
नांदेड शाहूनगर वाघाळा येथील रहिवाशी महिला अहिल्याबाई चांदु गजभारे ( वय ५८) यांचे शुक्रवारी ( दि.९) दु. १२ :१५ वाजता हैदराबाद येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे मूळ गाव ढाकणी ता. लोहा येथील शेतात शुक्रवारी रात्री ८ :३० वा त्यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, पाच मुली, जावई, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दैनिक वाचकमंचचे कार्यकारी संपादक माधव गोधणे यांच्या त्या मोठ्या बहिण होत.

कै.विठ्ठलराव दिवेकर यांना
उमरखेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव दिवेकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हाणी झाल्याची प्रतिक्रिया विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रध्दांजली वाहतांना व्यक्त केली.
कै.विठ्ठलराव दिवेकर यांचा सामाजिक, धार्मिक आणि साहित्यक्षेत्राशी जवळचा संबंध राहिला आहे. अ.भा.बौध्द महासभेचे जिल्हाकार्यालयीन सचिव डी.एन.कांबळे, उपाध्यक्ष युवराज मोरे, मनपा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मारोती कांबळे, सामाजिक सुरक्षा समितीचे अध्यक्ष शिवराज कांबळे, कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद खाजा, लिडकॉमचे शाखा व्यवस्थापक प्रताप गांगुर्डे, जोगेंद्र गोवंदे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रफुलकुमार सावंत, पत्रकार महेंद्र आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी कै.विठ्ठलराव दिवेकर यांच्या आठवणींना उजाळा देत श्रध्दांजली अर्पण केली!

जगन्नाथ अंकमवार (जगन्नाथ शेठ) यांचे निधन

नांदेड – जुन्या नांदेडातील चौफाळा येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ अंकमवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते मृत्यूसमयी ७४ वर्षांचे होते. सिडको येथील स्मशानभूमीत (ता. ९ एप्रिल) त्यांच्या  पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सहशिक्षिका मिनाक्षी अंकमवार यांचे वडिल तर प्रसिद्ध साहित्यिक पांडूरंग कोकुलवार यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात चार मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते जगन्नाथ शेठ या नावाने परिचित होते.

Total Page Visits: 814 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top