
NANDED TODAY: 30,July,2021 नांदेड/प्रतिनिधी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासमोर सत्यता मांडली जाते. त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात येणार्या विद्यार्थ्यांना सामाजिक जाण असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी केले.
एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयात दि. 29 आयोजित दीक्षांत समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी, प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,

तहसीलदार सारंग चव्हाण यांच्यासह आदींची उपस्थिती होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत एमजीएम माध्यमशास्त्र विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षाअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना पदवीका वितरण सोहळा एमजीएम
पत्रकारिता महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे म्हणाले की, 2001 मध्ये मलाही दीक्षांत समारंभात पदवी स्वीकारण्याचा योग आला. राज्यपालांच्या हस्ते मला बी.कॉम.ची पदवी मिळाली आहे. पत्रकारिता क्षेत्रात
काम करणार्यांसमोर वेगवेगळे आव्हाने आहेत. प्रशासकीय सेवेत कार्य करताना अधिकारी होऊन अधिकार गाजवणे हे होऊ शकते. परंतु लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात कार्य करत असताना आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी जीवनभर प्रयत्न करावे लागतात. पत्रकारिता करत असताना समाजात कार्य करणार्या लोकांकडून

पत्रकारांना धमक्या देणे, गुन्हे दाखल करणे अशा घटना घडत आहेत. खर बोलणार्यांचा अंत होईल, पण खरे कधी लपणार नाही हे आयुष्यभर करावे लागेल. आज-काल इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे बातम्या प्रसिद्धीसाठी घाई होत आहे. खोट्या
बातम्याही येत आहेत. याचे भान व जबाबदारी प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वावरत असताना तीन स्तंभाचा रोष ओढवून घ्यावा लागतो, त्यांचा विरोधही अनेकदा पत्रकारिता क्षेत्रातील लोकांना सहन करावा

लागतो. हे सर्व सहन करायचे असेल तरच विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे वळावे. पदवी घेऊन पत्रकारितेचा प्रवास सुरू होतो. रवीश कुमार यांना ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात, कारण त्यांना समाजाची जाण आहे. समाजत काय वाईट, काय चांगले आहे
याची माहिती त्यांना आहे. अशा पत्रकारांना विद्यार्थ्यांनी फॉलो करणे गरजेचे आहे. पत्रकारांच्या लेखणीमुळे बॉर्डरवर चालणार्या गोळ्यापेक्षा जास्त लोक जखमी होतात, भ्रष्टाचार थांबतो व तो उघडकीस आणण्याचे काम पत्रकार करतो. पत्रकारांच्या

लेखणीमुळे भारतीय संस्कृतीवर होणार्या हल्लेही थांबतात. या पद्धतीने पत्रकारिता क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पत्रकारिता करावी. पत्रकारिता क्षेत्र निवडताना हे आपल्या लिखाणाचा समाजावर काय परिणाम होतो, याचा विचार होणे आवश्यक असून
सुशिक्षीत पत्रकार निर्माण होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान यावेळी तहसीलदार सारंग चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पत्रकार प्रशासनावर अंकुश ठेवतात. बाळशास्त्री जांभेकर यांनी

पत्रकारितेची मुहूतमेढ रोवली. तेव्हा प्रिंट मीडियापासून आजच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा हा पत्रकारिता क्षेत्रातील हा बदलता प्रवास आहे. भारताच्या स्वातंत्र्यात पत्रकारांची भुमिका मोलाची राहिली आहे. इंग्रजाच्या विरोधात आवाज उठविण्याचे
काम त्यावेळी पत्रकारितेच्या माध्यमातून झाले आहे. बातमी देत असताना घटनेची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे. जबाबदारीचे भान ठेवावे लागते. चुकीच्या बातमीमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकतात. म्हणून समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकारितेमुळे होते, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी तर सुत्रसंचलन ऋषीकेश कोंडेकर यांनी केले तर आभार प्रा. राजपाल गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्तीतेसाठी प्रा. डॉ. प्रविणकुमार सेलुकर, प्रा. सतिष वागरे, दीक्षा कांबळे, हणमंत येनाळगे यांनी प्रयत्न केले.