
NANDED TODAY:07,Nov,2021 नांदेड :- पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात झाला असल्यानेच सातत्याने अतिवृष्टी , अनावृष्टी आदी संकटांचा सामना करावा लागत आहे .गेल्या महिन्यात झालेली अतिवृष्टी याचाच परिणाम आहे यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करून पर्यावरणाचे रक्षण करावे असे आवाहन पालक मंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
येथील आयटीएम कॉलेज परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालय येथे शनिवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दै .सत्यप्रभाच्या दीपोत्सव दिवाळी अंकाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.दत्ता भगत

यांच्या हस्ते झाले यावेळी अध्यक्षीय समारोपात पालक मंत्री ना. अशोकराव चव्हाण बोलत होते व्यासपीठावर विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर , माजी मंत्री डी .पी.सावंत ,आ. मोहन हंबर्डे ,जि
.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर ,.महापौर जयश्री पावडे , उप महापौर मसूदखान , कार्यकारी संपादक संतोष पांडागळे ,मुख्य संपादक शिवानंद महाजन ,संचालक संदीप पाटील ,सल्लागार बालाजी जाधव ,कर सल्लागार मनोहर आयलाने आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना पालक मंत्री ना. अशोकराव चव्हाण म्हणाले की ,अतिवृष्टी , अनावृष्टी आदी संकटांचा सामना सातत्याने करावा लागत आहे तरीही पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी ती इच्छा शक्ती दिसत नाही हे चालणार नाही आता
सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्य शासन पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी माझी वसुंधरा’ अभियान राबवत आहे .

कोरोना काळात विशेषतः आरोग्य सुविधेवर अधिक भर देण्यात आला या समवेतच पायाभूत सुविधा साठी आपला प्रयत्न सुरूच आहे.समृद्धी महामार्गासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले त्यांनी सकारात्मक
निर्णय घेतला भूसंपादनासाठी १० हजार कोटी मंजूर झाले या जालना-नांदेड समृद्धी महामार्गामुळे मुंबईचे अंतर ६ घंट्यांत पूर्ण करता येणार आहे. देशात उत्कृष्ट ते नांदेडला असावे यासाठीचा आपला प्रयत्न यापुढेही सुरूच राहील असे ना. चव्हाण यांनी सांगीतले आहे.

यावेळी बोलताना प्रा. डॉ.दत्ता भगत म्हणाले की , दै .सत्यप्रभाचा दीपोत्सव दिवाळी अंक देखणा आणि अतिशय दर्जेदार आहे ,दिवाळी अंकामध्ये नवोदित लेखक व कवी यांचे साहित्य असून ते नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल .
अनेक दिवाळी अंक पाहताना असे दिसते की मजकूर कमी जाहिराती अधिक मात्र दीपोत्सव दिवाळी अंक अर्थकारणासाठी नाही हि चांगली बाब आहे. यातून नव्या पिढीला साहित्याचा खजिना उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगीतले आहे. महाराष्ट्रात विनाअट सहभागी झालेल्या मराठवाड्यावर विकासाच्या बाबतीत अन्याय झाला
हा विकासाचा अनुशेष भरून आणणे गरजेचे आहे .ना. अशोकराव चव्हाण ज्या खात्याचे मंत्री झाले त्यांनी आपल्या कामातून त्या खात्याची वेगळी ओळख निर्माण केली .महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण ही ना. अशोकराव चव्हाण या खात्याचे मंत्री झाल्यानंतर ठरल्याचे त्यांनी सांगीतले ना. चव्हाण यांच्या मुळेच नांदेडला नाट्यसंमेलन झाले आता साहित्य संमेलनासाठी प्रयत्न करण्यात यावा अशी अपेक्षा प्रा. डॉ.दत्ता भगत यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी आ. अमरनाथ राजूरकर म्हणाले की गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे एकीकडे सर्वच क्षेत्र प्रभावी झाले यात वर्तमानपत्रांचाही समावेश होता अशा आव्हानाच्या परिस्थितीला संधीत परावर्तित करून दै .सत्यप्रभाने वाचकांना वास्तववादी ,चांगला मजकूर दिला .
सध्या दै .सत्यप्रभाने बातम्या, मांडणी यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आता प्रकाशीत झालेला दै .सत्यप्रभाचा दीपोत्सव दिवाळी अंक निश्चित वाचकांच्या पसंदीस पडेल असा विश्वास व्यक्त केला आहे यावेळीं माजी मंत्री डी .पी.सावंत
,.महापौर जयश्री पावडे यांनीही दै .सत्यप्रभाचा दीपोत्सव दिवाळी अंक देखणा आणि अतिशय दर्जेदार असल्याचे सांगीतले आहे.कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांनी प्रास्ताविकात दिवाळी अंकाचे अंतरंग उलगडून सांगितले. तसेच वृत्तपत्र म्हणून दै .सत्यप्रभाने वेळोवेळी घेतलेली ठाम

भूमिका, बातम्यांपलीकडे जाण्याची पद्धत, वेगळेपणा, प्रयोगशीलता, सादरीकरणातील नाविन्य आणि कल्पकता यांचे विवेचन केले.दै .सत्यप्रभाला .ना. अशोकराव चव्हाण यांच्या मुळे राज्याश्रय आहे आता आणखी लोकाश्रयाची गरज असल्याचे सांगीतले आहे.
उत्कृष्ट निर्मिती व संपादन यासाठी शिवानंद सुरकुंठवार व दत्ता डांगे यांचा मान्यवरांनी सत्कार केला . याकार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्यंकटेश चोधरी तर उपस्थितांचे आभार ,दै .सत्यप्रभाचे कर सल्लागार मनोहर आयलाने यांनी मानले आहे. प्रकाशन सोहळ्यास साहित्यिक, पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती .