पालावरच्या 650 कुटुंबातील महिलांचे चेहरे खुलले आशिर्वाद कपडा बँक व सुनील डोईजड यांच्यावतीने वस्त्ररुपी दान..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > पालावरच्या 650 कुटुंबातील महिलांचे चेहरे खुलले आशिर्वाद कपडा बँक व सुनील डोईजड यांच्यावतीने वस्त्ररुपी दान..!

पालावरच्या 650 कुटुंबातील महिलांचे चेहरे खुलले आशिर्वाद कपडा बँक व सुनील डोईजड यांच्यावतीने वस्त्ररुपी दान..!

Spread the love

NANDED TODAY ARDHAPUR: 24,June,2021 सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असलेले भटक्या विमुक्त जाती जमातीचे नेते सुनील डोईजड यांच्या पुढाकारामुळे अर्धापूर तालुक्यातील पालावरच्या जवळपास 650 कुटुंबातील पुरुष,स्त्रीया व मुलांना शर्ट, पॅन्ट व साडींचे वाटप करण्यात आले. ऐन संकटात असलेल्या या कुटुंबांना या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुनील डोईजड यांचे समाज प्रबोधन, सामाजिक चळवळीत मोठे योगदान आहे. रक्तदान, रस्त तपासणी, अँटीजेन तपासणी, आरटीपीसीआरची मोफत टेस्ट आदी उपक्रम राबवून त्यांनी समाजसेवा केलेली आहे. तसेच लॉकडाऊन काळात अन्नधान्यांच्या कीट वाटप करून त्यांनी भटक्या समाजाचे दुःख वाटून घेतले आहे.

अर्धापूर शहरात विविध भागात पालं टाकून राहणा-या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या 650 च्यावर कुटुंबांना सुनील डोईजड यांनी आशीर्वाद कपडा बँकेच्या माध्यमातून कपडे रुपी साडी, पँट, व शर्टचे मोफत वाटप केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ.रोहीणी सुनील लढ्ढा, सौ.रेणुका गिरीश बाल्दी, सौ.सुनयना भूषण डागा, सौ. पुनम योगेश बियाणी, कु.विधी कचरुसेठ बजाज, योगेश बियाणी,युवा नेते मा.विश्वास कदम

माजी नगरसेवक अर्धापूर व्यंकटी राऊत, श्री श्री चे सेवक मा.सतीशसेठ गोविंदवार, गोविंद वट्टमवार, मा.शैलेश मुखेडकर, वासुदेव समाजाचे नेते मा.गणेश चव्हाण, प्रा.भास्कर थिटे पाटील मा.मनीष जाधव, नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मा.कचरूसेठ बजाज,

मा.आशीषसेठ बियाणी, गणेश सेठ जाजू, युवा उद्योजक मा.प्रशांत क-हाळे, शरद मांगीलवार ऍड. प्रसाद राणळकर गुलजार ठाकूर भटक्या विमुक्त समाजचे नेते मा.नारायण बाबर, साईनाथ शिंदे व भावराव शितोळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Total Page Visits: 939 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top