
NANDED TODAY:05,August,2021 लोहा (वार्ताहर) जिल्हा परिषदेचे अभ्यासू आणि डॅशिंग सदस्य तथा लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे कणखर युवा नेतृत्व प्रवीण पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मतदारसंघात वाढदिवसानिमित्त चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषदेत अभ्यासू आणि विरोधकांची कोंडी करणारे, भ्रष्टाचाराचे उत्खनन करून जिल्हा परिषदेतील भोंगळ कारभाराला लगाम लावणारे जि.प. सदस्य तथा लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे असंख्य युवकांचे प्रेरणास्थान डॅशिंग नेतृत्व

प्रवीण पाटील चिखलीकर यांचा आज दि. ४ ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील जवळजवळ ६० ठिकाणी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण, अन्नदान आदी कार्यक्रम यावेळी घेण्यात आले. असंख्य कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी

आणि आप्तेष्टांनी प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शुभेच्छा दिल्या. आमदार तुषार राठोड आमदार भीमराव केराम निलेश ठक्कर आ. माधवराव पाटील जवळगावकर, भाजपाचे नेते दिलीप कंदकुर्ते, पुरुषोत्तम धोंडगे, वसंत सुगावे बालाजी बच्चेवार

श्रावण पाटील भिरवंडे लक्ष्मण माधवराव उचेकर गंगाधरराव जोशी व्यंकटराव पाटील गोजेगावकर शिवराज पाटील होटाळकर मिलिंद देशमुख बंडू पावडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रवीण पाटील चिखलीकर यांचे अभीष्टचिंतन केले. लोहा-कंधार
विधानसभा मतदारसंघात आजही युवा नेतृत्व म्हणून प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाचे गारूड आहे. ग्रामीण भागात आयोजित करण्यात आलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
