प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या मनाचा मोठेपणा : चिखली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी दिली दुसऱ्याला संधी..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Nanded City News > प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या मनाचा मोठेपणा : चिखली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी दिली दुसऱ्याला संधी..!

प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या मनाचा मोठेपणा : चिखली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी दिली दुसऱ्याला संधी..!

Spread the love

NANDED TODAY:14,Feb,2021

नांदेड :  सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्याशिवाय इतरांना संधी मिळणार नाही आणि जोपर्यंत इतरांना संधी मिळणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने  लोकशाहीला बळकटी येणार नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषद सदस्य तथा नांदेड जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण पाटील चिखलीकर यांनी चिखली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आपल्या पत्नी ऐवजी इतर तरुण कार्यकर्त्यास संधी देऊन मनाचा मोठेपणा दाखविला आहे.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या . त्यात कंधार तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीचाही समावेश होता . चिखली ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी राखीव असल्याने साहेबराव पोटफोडे  या तरुण कार्यकर्ता सरपंच पदाची संधी दिली. या तर निवडणुकीच्या रिंगणात जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या सुविद्य पत्नी सौ वैशालीताई प्रवीण चिखलीकर याही उतरल्या होत्या . सौ. वैशालीताई चिखलीकर यांचा मोठ्या फरकाने दुसऱ्यांदा विजय झाला. निवडणुकीतही वैशालीताई चिखलीकर या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या. दोन्ही वेळेस सरपंच आणि उपसरपंच पदाची सूत्रे आपल्या हातात न घेता गावाला आपले कुटुंब समजत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण पाटील चिखलीकर यांनी सत्तेच्या चाव्या आपल्या सहकाऱ्यांच्या दिल्या.  यावेळी मनाचा मोठेपणा दाखवत उपसरपंचपदी आपल्या पत्नीला विराजमान न करता या गावातील अच्युतराव पवळे यांना संधी दिली. सलग दोन वेळा सत्तेच्या चाव्या हातात घेण्याची संधी आल्यानंतरही प्रवीण पाटील चिखलीकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि सत्तेत सर्वांना समान संधी मिळावी या उद्देशाने उपसरपंच पदाची धुरा आपल्या सहकार्याच्या हाती सोपवली. सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गाचे साहेबराव पोटफोडे यांची निवड करण्यात आली. या ग्रामपंचायत निवडणुकीत वैशालीताई प्रवीण पाटील चिखलीकर यांच्यासह ज्योतीताई रामदास कदम ,नंदाताई बाबुराव लाटकर ,पंचफुलाबाई कामाजी पांचाळ , विश्वंभर गोविंदराव कदम याही ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी झाले आहेत.  नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच उपसरपंच यांचा ही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर प्रवीण पाटील चिखलीकर यांनी स्वागत केले आहे.

Total Page Visits: 1764 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top