
NANDED TODAY:02,August,2021 बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी सक्षम बनले पाहिजे-संध्याताई कल्याणकर
अण्णाभाऊ साठे यांची जयती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महिलांना व्यवसाय मार्गदर्शन शिबिर
नांदेड-उत्तर मतदारसंघातील प्रत्येक गावात आ. बालाजी कल्याणकर यांच्या पत्नी संध्याताई कल्याणकर यांनी महिलांचे बचत गट तयार केले आहेत. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी

निमित्त महिलांना व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे शिवपार्वती मंगल कार्यालयात आयोजन केले होते. यावेळी बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी सक्षम बनले पाहिजे असे संध्याताई कल्याणकर यांनी मत व्यक्त केले आहे. यावेळी नांदेड
उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर, औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक संतोष कानगुलकर, कृषी विभागाचे चंद्रशेखर कदम, जिल्हा उद्योग केंद्राचे रमेश जायभाये, प्रकाश गिरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहरी व ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय सुरू करून, आपल्या कुटुंबाला हातभार लावला पाहिजे. त्यासाठी मी आ. बालाजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी असे मार्गदर्शन शिबिरांचे
आयोजन करणार आहे. तसेच महिलांनी पुरुषांच्या खांद्याला- खांदा लावून काम केले पाहिजे. असे मत या वेळी संध्याताई कल्याणकर यांनी व्यक्त केले आहे. या कार्यक्रमात नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी बोलताना, महिलांची

कोणतीही अडचण असो ती मी सोडवण्यास तयार आहे. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावात मी नेहमीच येत असतो, त्यावेळी देखील मला आपण भेटून अडीअडचणी सांगत जा. मी त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक संतोष कानगुलकर यांनी देखील महिलांना मार्गदर्शन करताना आपल्या भागातील महिलांना फक्त मार्गदर्शनाची गरज आहे.
या महिला नक्कीच बचत गटाच्या माध्यमातून वेग वेगळे व्यवसाय सुरु करतील. व्यवसायाबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तसेच कृषी विभाग विभागाचे चंद्रशेखर कदम यांनीदेखील कृषी विभागामार्फत बचत गटासाठी वेगवेगळ्या योजना असून त्याचा महिलांनी लाभ घेतला पाहिजे.
तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे रमेश जायभाये यांनी देखील जिल्हा उद्योग केंद्रामार्फत महिला बचत गटांसाठी अनेक योजना आहेत. नांदेड उत्तर मतदारसंघातील बचत गट सध्या या योजना घेत देखील आहेत.
आपल्यापैकी अनेक महिलांनी उद्योग उभे केले आहेत. ते चांगल्या प्रकारे सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. यावेळी मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या.