बसस्थानकाचे काँक्रिटीकरण होणार विश्वासू प्रवासी संघटनेच्या सर्व पदाधिका-यांचा विभाग नियंत्रकाच्या हस्ते सत्कार.! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > बसस्थानकाचे काँक्रिटीकरण होणार विश्वासू प्रवासी संघटनेच्या सर्व पदाधिका-यांचा विभाग नियंत्रकाच्या हस्ते सत्कार.!

बसस्थानकाचे काँक्रिटीकरण होणार विश्वासू प्रवासी संघटनेच्या सर्व पदाधिका-यांचा विभाग नियंत्रकाच्या हस्ते सत्कार.!

Spread the love

नांदेड, दि.22- प्रवाशांच्या समस्यांचे माहेरघर असलेल्या नांदेडच्या बसस्थानकाचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. याबाबतचा कार्यादेश मिळाल्याने नुकतेच बसस्थानकात कंत्राटदाराने कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू केल्याने सर्व प्रवासातून

आनंद व्यक्त होत आहे. काँक्रिटीकरणच्या काम करण्यासाठी विश्वासू प्रवासी संघटनेच्या सर्व सदस्यांसह अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण व नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे

यांच्याकडे पाठपुरावा करून मागणी केली होती. या मागणीस मंजुरी देऊन बसस्थानकावर पाच कोटीचा निधी प्राप्त झाला आणि त्यानुसार हे काम करण्यात येत आहे. काँक्रिटीकरणाचे हे काम बसस्थानकातील विश्वासू प्रवासी संघटनेच्या

पाठपुराव्यामुळेच सुरू झाले. याचे श्रेय विश्वास प्रवासी संघटनेलाच आहे म्हणून विभागीय नियंत्रक अशोक पन्हाळकर यांनी आज सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
यावेळी विश्वासू प्रवासी संघटना अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांचा सत्कार विभाग

नियंत्रक अशोकराव पन्हाळकर यांनी भव्य पुष्पहार टाकून केला. तर विश्वासू प्रवासी संघटनेचे पदाधिकारी उपाध्यक्ष कृष्णा उमरीकर, सचिव सौ.ललिताताई कुंभार, सदस्य अमरजितसिंघ कालरा, डाॅ. हरदीपसिंग बेदी, गणेश वडगावकर,

रमाकांत घोणसीकर, मनोज पाटील, नेहा शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विभागीय वाहतूक अधिकारी संजय बा. वाळवे, उपयंत्र अभियंता यशपाल मात्रे, उपअधिक्षक मंगेश कांबळे, विभागीय कर्मवर्ग अधिकारी राहूल पुरी, वाहतूक

पर्यवेक्षक सौ.वंदना चापोलीकर, वाहतूक निरीक्षक सौ.सुरेखा पवार, संतोष हाटकर, भानुदास बुदेवार, दीपक शेडगे, साईनाथ गंदेवार, हनमंत शिंदे, राजू कदम, अर्चना पवार, मिनाताई गिते, यमुना उकंडे, देशमाने, मुनीरोद्दीन, अनिल जाधव, मारोती

सूर्यवंशी, प्रकाश कल्याणपाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर गिते यांनी केले आभार प्रदर्शन विभागीय वाहतूक अधिकारी संजय बा. वाळवे यांनी मानले.

चौकट
‘विश्वासू’मुळेच बसस्थानकात विकासाची कामे होत आहेत बसस्थानकातील समस्यांना विश्वासू प्रवासी संघटनेच्या पदाधिका-यांना लक्ष घातल्यानेच 50 वर्षापासूनचा खड्डा बुजविल्या गेला.

शिवाय बसस्थानकावर गावांचे फलक लावले गेले. बसस्टँडची साफसफाई झाली आणि आता संपूर्ण काँक्रिटीकरणाचे काम होत आहे. याचे सर्व श्रेय अध्यक्ष शंकरराव नांदेडकर व त्यांच्या टीमलाच जाते. त्यांना कार्याचा गौरव करायला हवा, त्यामुळे सत्कार केला.

Total Page Visits: 482 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top