भाजपाच्या उभारणीत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे योगदान अतुलनीय – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नांदेडमध्ये अभिवादन.! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > भाजपाच्या उभारणीत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे योगदान अतुलनीय – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नांदेडमध्ये अभिवादन.!

भाजपाच्या उभारणीत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे योगदान अतुलनीय – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नांदेडमध्ये अभिवादन.!

Spread the love

NANDED TODAY:04,June,2021 नांदेड :* राज्यात आणि देशात भारतीय जनता पार्टी ज्या नेटाने उभी राहिली ती अनेक नेत्यांच्या, पुढाऱ्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या आणि कार्यकर्त्यांच्या योगदानातून उभारली असून स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचेही भाजपाच्या उभारणीत अतुलनीय योगदान राहिले आहे, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांना अभिवादन केले.

देवेंद्र फडणवीस काल नांदेड दौऱ्यावर आले होते. रात्री मुक्काम केल्यानंतर आज सकाळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह आ.राम पाटील रातोळीकर, आ.राजेश पवार, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगर अध्यक्ष प्रवीण साले, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, एडवोकेट संदीप पाटील चिखलीकर, भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्या

प्रणिताताई देवरे चिखलीकर, सचिन चिखलीकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य संतुकराव हंबर्डे, एडवोकेट शिवाजीराव जाधव, वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉ. अजित गोपछडे, डॉ.सचिन उमरेकर भाऊराव देशमुख, गंगाधरराव जोशी श्रावण पाटील भिलवंडे, लक्ष्मण ठक्करवाड , दिलीप ठाकूर, विजय गंभीरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Total Page Visits: 274 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top