मराठा समाजाला आरक्षण द्या खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची संसदेत मागणी..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > मराठा समाजाला आरक्षण द्या खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची संसदेत मागणी..!

मराठा समाजाला आरक्षण द्या खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची संसदेत मागणी..!

Spread the love

NANDED TODAY:06,August,2021 नांदेड : महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक पाऊले उचलावीत अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शुन्य प्रहार प्रश्र्नउत्तरच्या वेळी केली.

महाराष्ट्रातील मराठा समाजाची सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात होत असलेली घसरण ही चिंताजनक आहे . ग्रामीण आणि शहरी भागातील मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीच्या अनुषंगाने आरक्षणाची नितांत गरज आहे .

समाजात वाढती शैक्षणिक बेरोजगारी चिंतेची बाब असल्याने मराठा समाजातील भविष्यातील पिढ्यांसाठी मराठा आरक्षण अत्यंत आवश्यक आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक लढा दिला जात आहे .

राज्यात ऐतिहासिक मूक मोर्चे काढण्यात आले. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते.

महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षण अवाजवी मताने परित करण्यात आले परंतु त्यानंतर मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्या नंतर महाविकास आघाडीच्या सरकारला हे आरक्षण टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आव्हानाला सक्षम उत्तर देता आले नाही.

आरक्षणाची बाजू मांडत आली नाही. माहाविकास आघाडी सरकारने सरकारी अभिवक्त्यास योग्य माहिती पुरविली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आरक्षण रद्द होण्यासाठी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे दळभद्री सरकार जबाबदार असून राज्यातील मराठा समाजामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा समाजाचे आरक्षण कायम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल उचलावे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शून्य प्रहरमधील प्रश्न उत्तरच्या वेळी केली.

Total Page Visits: 998 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top