महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योध्दा व रक्तदान शिबीरांचे आयोजन – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योध्दा व रक्तदान शिबीरांचे आयोजन

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योध्दा व रक्तदान शिबीरांचे आयोजन

Spread the love

NANDED TODAY: 11,Feb,2021 ( Raj Mohamd Ahmdpur ) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुबंई, शाखा अहमदपूर च्या वतीने दि.12 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता यशवंत विद्यालय,फुले नगर अहमदपूर येथे कोरोना योध्दांचा सत्कार व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कोरोनाच्या संकट समयी कार्य करणारे आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व पत्रकार बांधव यांनी कोरोना योद्धा म्हणून जी कर्तव्य पार पाडले अशा व्यक्तीचे कोरोना योद्धा म्हणून सत्कार तसेच भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आ. बाबासाहेब पाटील (अहमदपूर -चाकूर विधानसभा मतदार संघ) कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभोदय मुळे (उपविभागीय अधिकारी अहमदपूर) विशेष उपस्थिती शिक्षण महर्षी,शिक्षक रत्न डी.बी.लोहारे गुरुजी, प्रमुख पाहुणे अशोक देडे( जिल्हाध्यक्ष मराठी पत्रकार संघ लातूर), जीवन देसाई (उपविभागीय अधिकारी लातूर), महेश सावंत (जिल्हा पुरवठा अधिकारी) प्रसाद कुलकर्णी (तहसीलदार- अहमदपूर )नानासाहेब लाकाळ (पोलीस निरीक्षक अहमदपूर), डॉ. दत्तात्रेय बिराजदार (वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आमदपुर ),त्र्यंबक कांबळे (मुख्य अधिकारी नगरपालिका अहमदपूर )डॉ. एम एन रेड्डी,डॉ.आशोकराव सांगवीकर,डॉ.सुनीता ताई चवळे, डॉ.भालचंद्र पैके, यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा अहमदपूर संघाचे अध्यक्ष विश्वंभर स्वामी सचिव शिवाजी पाटील, उपाध्यक्ष गजानन भुसारे ,प्रा.रत्नाकर नाळेगावकर,सहसचिव शिवाजीराव गायकवाड,कोषाध्यक्ष चंद्रकांत शिंदे,समन्वयक बालाजी पारेकर,संघटक बालाजी तोरणे,प्रतिनिधी प्रमुख बालाजी कारामुंगीकर,सुरेश डबीर,दिनकर मद्देवाड,मारोती बुद्रुक पाटील,मेघराज गायकवाड ,जगन्नाथ पुणे,उद्य गुंडीले,महादेव महाजन,चद्रशेखर भालेराव,अरविंद पौळ,मासुम शेख,बालाजी काळे,गणेश मदने,धम्मानंद कांबळे,अजय भालेराव यासह पत्रकार बांधव व सत्कार संयोजन समिती अहमदपूर नियोजनात कार्यक्रम पार पडणार आहे

Total Page Visits: 978 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top