
कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथे जागतिक महिला दिन साजरा
NANDED TODAY:08,March,2021 नांदेड- कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. मोरे, प्रमुख पाहुण्या म्हणून नांदेड उत्तर विधानसभेचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या सुविद्य पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या संध्या कल्याणकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी शंकर पवार, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात महिलांचे नेतृत्व व सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून नांदेड उत्तर विधानसभेचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या सुविद्य पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या संध्या कल्याणकर यांनी ग्रामीण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून संघटित करून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मागील एक वर्षाच्या काळापासून अथक परिश्रम करून यशस्वी ग्रामीण महिला उद्योग निर्मितीमध्ये मोलाचे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या या कार्याची ओळख व गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.
तसेच कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी च्या वतीने प्रशिक्षित ग्रामीण महिलांनी गृह उद्योगाची निर्मिती करून आर्थिक उन्नती साधलेली आहे. त्या सर्व महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना संध्या कल्याणकर यांनी ग्रामीण महिलांसाठी विविध उपक्रम व उद्योग निर्मितीचे ध्येय बोलून दाखवले. तसेच महिलांनी उद्योग सुरू करणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्यासाठी तयार असल्याचे ही त्यांनी बोलून दाखविले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका तथा ग्रह विज्ञान तज्ञ प्रा. एस. आर. नादरे यांनी केले. कृषी विज्ञान केंद्राची ओळख डॉ. देविकांत देशमुख यांनी करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीक संरक्षण तज्ञ प्रा.माणिक कल्याणकर व आभार प्रदर्शन विस्तार तज्ञ डॉ. गिरीश देशमुख यांनी केले. यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. संदीप जायभाये, डॉ. महेश आंभोरे, अशोक भालेराव, राकेश वाडीले, शिवाजी जाधव, हाडोळतीकर, दत्ता कदम, सुदाम गायकवाड, शंकर कोनापुरे व सायाळ, लिबंगाव, पोखर्णी व परिसरातील महिला उपस्थित होत्या.
बरोबर आहे काकी