राज्य व जिल्ह्यासाठी हवी तेवढी लस – खा.चिखलीकर – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > राज्य व जिल्ह्यासाठी हवी तेवढी लस – खा.चिखलीकर

राज्य व जिल्ह्यासाठी हवी तेवढी लस – खा.चिखलीकर

Spread the love

NANDED TODAY:19,April,2021 नांदेड : सद्यस्थितीला राज्यातील महाविकास आघाडीचे नेते कोरोना लस उपलब्ध नसल्याचा आव आणत राजकारण करत असून प्रत्यक्षात स्थिती वेगळी असून राज्य व नांदेड जिल्ह्यासाठी लागेल तेवढी लस केंद्र शासन देण्यास तयार असून लसीसंदर्भाने केंद्रीय आरोग्य मंत्री मा.ना.डॉ.हर्षवर्धन व आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रदिप हलदर यांच्याशी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संवाद साधल्यानंतर राज्य व जिल्ह्यासाठी लागेल तेवढी लस उपलब्ध असल्याची माहिती खा.चिखलीकर यांनी दिली आहे.

राज्यासह जिल्ह्यात सद्यस्थितीला कोरोना लसीवरुन महाविकास आघाडीचे नेते लसीचा राज्यातील पुरवठा होत नाही किंवा लस पुरवठा करतांना केंद्र शासनाकडून भेदभाव केल्याचा आरोप केला जात आहे. याच आरोपात किती तथ्य आहे. हे पाहण्यासाठी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मा.ना.डॉ.हर्षवर्धन व आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तथा कोव्हिड व्हॅक्सीन मेडीशीनचे प्रभारी प्रदिप हलदर यांच्याशी संवाद साधत लस उपलब्धीबाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी हलदर यांनी महाराष्ट्राला व नांदेड जिल्ह्यास लागेल तेवरी लस देण्यास कटीबध्द असल्याची ग्वाही दिली असल्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.व्हॅक्सीन लसी संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजीराव शिंदे यांच्याशी देखील चर्चा करुन माहिती घेतली.

जिल्ह्याला लसीची कमतरता भासू नये यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य संचालिका डॉ.अर्चना पाटील यांच्याशी खा.चिखलीकर यांनी संवाद साधला आहे. यामुळे राज्य व नांदेड जिल्ह्याला लागेल तेवढी लस उपलब्ध होणार आहे. नांदेडच्या नागरिकांनी कुणाच्याही भुलथापांना बळी न पडता कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन खा.चिखलीकर यांनी केली आहे. राज्य व नांदेड जिल्ह्याला अधिकची लस मिळावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या प्रयत्नबद्दल खा.चिखलीकर यांनी आभार मानले आहेत.

Total Page Visits: 1036 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top