
वाई बाजार येथे ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा,सर्वधर्मीय सहभागाने वातावरण बनले धम्ममय
NANDED TODAY: 16,Oct,2021 अविनाश पठाडे,वाईबाजार : ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वाई बाजार येथील दीपवंश बुध्द विहार परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला असून मान्यवरांचे विश्लेशनात्मक प्रबोधन व भिम बुध्द गितांच्या मधूर मेजवाणीने संपुर्ण वातावरण धम्ममय बनले होते.
१४ ऑगस्ट १९५६ रोजी अशोक विजयादशमीच्या पावन पर्वावर नागपूरच्या दिक्षाभुमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पाच लाख अनुयायांसह बौध्द धम्माची दिक्षा घेतली होती.
तो अशोक विजयादशमीचा दिवस आंबेडकरी जनता मोठ्या हर्षोल्हासात साजरा करून डॉ.आंबेडकरांना अभिवादन करतात.. याच दिनाचे औचित्य साधून मौजे वाई बाजार येथे आज दि.१५ ऑक्टोबर रोजी महामानवास अभिवादनासह महाभोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते.
तत्पुर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील निळ्या ध्वजाचे जेष्ठ धम्मउपासक उकंडराव गायकवाड, परसराम कंधारे, प्रदीप टोके व प्रल्हाद सातव यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
तर कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण दीपवंश बौध्द विहार परिसरातील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन रमाई महिला मंडळाच्या भगिनींच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर वाई बाजारचे माजी उपसरपंच हाजी उस्मान खान पठाण यांच्यासह
आंबादास राजूरकर व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपवंश बुध्द विहार परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे धम्मसंकारानुसार पुजन करून अभिवादन करण्यात आले.
तर बोधाचार्य संजय पाटील यांच्यामार्फत पंचशील उपस्थित शेकडो उपासक, उपासिका व अनुयायांच्या उपस्थितीत त्रिसरण व पंचशिलाचे ग्रहण करण्यात आले. तद्नंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. राजेंंद्र लोणे यांच्यासह प्रा. विनोद कांबळे व डॉ.झनक मानकर यांनी आपले विचार मांडल्यानंतर दुपारी भिम-बुध्द गितांच्या प्रबोधनात्मक विचारांची मेजवानी उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेली.
यावेळी प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते फिरोज खान उस्मान खान पठाण, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र लोणे, डॉ. झनक मानकर, माणिक शेंडे, हरी नगराळे, संजय ठमके, माणिक चंपत मुजमुले, सुभाष मुजमुले, प्राध्यापक विनोद कांबळे,
सहशिक्षक इंदोर भगत, मुनेश्वर थोरात, प्रल्हाद खडसे, दिलीप पठाडे, विनोद गेडाम, बंडू तायडे, दिगंबर खडसे, किसन ठमके, अवधुत ठमके, दिलीप खडसे, मुकुंद पारधे, सिद्धार्थ पारधे, सुनील खडसे, मिलिंद कंधारे, सागर खडसे, राहुल टोके, अविनाश पठाडे, रोहन पारधे, विषाल पारधे, शैलेश पारधे, मिलिंद गायकवाड, अक्षय
पठाडे,गौतम खडसे,राहुल पट्टेकर,हेमंत गायकवाड,तसेच पत्रकार राजकुमार पडलवार बाबाराव कंधारे, कार्तिक बेहेरे, प्रशांत शिंदे त्याचप्रमाणे दीपवंश बुध्द विहार समितीच्या पदाधिकारी, परिवर्तनवादी विचार मंच चे युवा स्वयंसेवक व रमाई महिला मंडळाच्या भगिनींची मोठ्या प्रमाणात होती. कार्यक्राचे सुत्रसंचालन सुभाष खडसे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. विनोद कांबळे यांनी केले.