वृत्तपत्र क्षेत्रातील प्रत्येक घटकाचा सन्मान कौतुकास्पद उपक्रम-गणेश रामदासी..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > वृत्तपत्र क्षेत्रातील प्रत्येक घटकाचा सन्मान कौतुकास्पद उपक्रम-गणेश रामदासी..!

वृत्तपत्र क्षेत्रातील प्रत्येक घटकाचा सन्मान कौतुकास्पद उपक्रम-गणेश रामदासी..!

Spread the love

NANDED TODAY:17,Feb,2021 नांदेड,(प्रतिनिधी)-एक तपापासून सातत्याने वृत्तपत्र क्षेत्रातील प्रत्येक घटकाचा सन्मान करून प्रोत्साहीत करणे खरोखर कौतुकास्पद उपक्रम असून अशाच पद्धतीने मराठवाड्याच्या माहिती संचालक कार्यालयाकडून पुरस्कार देण्याचा प्रयत्न केला गेला असून माणूस हा चुकीचा पुतळा असल्याने तो परिपूर्ण असेलच असे नाही, असे प्रतिपादन मराठवाड्याचे माहिती संचालक गणेश रामदासी यांनी केले.

मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषद, समीक्षा, ह्युमन राईट्स फाऊंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने देण्यात येणारे पुरस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयात प्रदान करण्यात आले.


या प्रसंगी मराठवाडा विभागाचे माहिती संचालक गणेश रामदासी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागचे  विभागप्रमुख प्रा.सुरेश पुरी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. सुरूवातीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देवून नांदेड पत्रकार संघाच्यावतीने महानगराध्यक्ष रविंद्र कुलकर्णी, दक्षिण जिल्हाध्यक्ष राजू पाटील, कंधार तालुकाध्यक्ष मिर्झा जमीर बेग, दिगांबर वाघमारे व रूपेश पाडमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यावेळी पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे यांना डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता तर दै.पुढारीचे औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक धनंजय लांबे यांना सुधारकर डोईफोडे प्रेरणादायी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच कृष्णूरसारखा मोठा धान्य घोटाळा उघडकीस आणून भ्रष्टाचाराविरूद्ध सतत लढा उभारणारे नांदेड चौफेरचे संपादक मोहम्मद आरेफ खान यांचा समीक्षा कर्तृत्व सन्मान देऊन गौरव करण्यात आला.

स्व.रामेश्वर बियाणी जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार दै.सत्यप्रभाचे गोपाळ देशपांडे,  ग्रामीण भागात लेखणीतून अन्यायाला वाचा फोडणारे कंधारचे दिगंबर गायकवाड यांना डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार, वृत्तपत्र क्षेत्रासहीत राजकारणात सक्रिय झालेले नगरसेवक तथा संपादक मुन्तजीबोद्दीन मुनीरोद्दीन यांना स्व.मिर्झा अहेमद अली बेग चुखताई पत्रकारिता पुरस्कार, सातत्याने  भ्रष्टाचारावर प्रहार करणारे दै.आनंदनगरीचे बजरंग शुक्ला यांना पंचनामाकार लक्ष्मणराव गायकवाड निर्भीड पत्रकारिता पुरस्कार, मीमांसा फाऊंडेशन ह्युमन राईट्स पुरस्कार शकिलउर रहेमान, वृत्तपत्र क्षेत्रातील जाहिरातीचा आधारस्तंभ दै.एकजुटचे सुनिल मुळे, वृत्तपत्र क्षेत्रातील सहकारी दुवा संगणक चालक राज आडसकर, वृत्तपत्र क्षेत्रातील तिसरा डोळा फोटोग्राफर सिडकोचे सारंग नेरलकर, स्व.माधव अंबुलगेकर युवा पत्रकारिता पुरस्कार नांदेड टुडेचे नईम खान तर स्व.सुरेश पटणे मुद्रण सेवा पुरस्कार सुनिल शिंदे यांना यावेळी प्रदान करण्यात आला.


या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक व दै.समीक्षाचे संपादक रूपेश पाडमुख यांनी प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार मानले. मागील 12 वर्षापासून आम्ही पत्रकार सन्मानाचा उपक्रम राबवतो आहे. आम्ही एक तप पूर्ण केले आहे, असे पाडमुख यांनी सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर खंदारे, जगन्नाथ सुपेकर, रमेश जाबा, विलास शिंगी, मुकेश मुंदडा, मनोज पाटणी, छबुराव ताके, अभय विखणकर, प्रशांत सूर्यतळे, किशोर दहिवडे, माजेद खान, सागर भोसले आदींची उपस्थिती होती.

Total Page Visits: 1163 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top