शेतकरयांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत द्या,खासदार प्रतापराव चिखलीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > शेतकरयांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत द्या,खासदार प्रतापराव चिखलीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

शेतकरयांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत द्या,खासदार प्रतापराव चिखलीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

Spread the love

NANDED TODAY:11,Sep,2021 शेतकरयांना सरसकट हेक्‍टरी 50 हजार रुपयाची मदत द्या :खासदार प्रतापराव चिखलीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ् गायांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सरसकट 50 हजार रुपये

आर्थिक मदत तात्काळ द्यावी अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उप मुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे .

नांदेड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच भागात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्या त्या भागाच्या आमदारांनी केली आहे.

खासदार या नात्याने नांदेड लोकसभा मतदार संघातील आणि जिल्ह्यातील अनेक भागाची मी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. जिल्ह्यातील 80 पेक्षा जास्त मंडळात अतिवृष्टीचा फटका बसल्याने नगदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सोयाबीन, उडीद, मूग, कापूस , ज्वारी ची पीक उध्वस्त झाली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे . पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिके करपली आहेत . काही भागात अद्यापही पीक पाण्याखाली आहेत.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ प्रति एकर 20 हजार रुपये प्रति हेक्‍टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात तात्काळ जमा करावी अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे.

दरम्यान अतिवृष्टीमुळे जा गावातील नागरिकांची घर पडली अथवा ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे अशा कुटुंबांना राज्य सरकारने तात्काळ आर्थिक मदत करावी त्यांना त्यांची घर सावरण्यासाठी विनाविलंब नुकसानग्रस्ताच्या बँक खात्यात मदतिच्या रकमा जमा कराव्यात

अशी मागणी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उप मुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. संकटकाळात घाबरून न जाता त्यातून धीराने आणि सायांमने मार्ग काढावा शिवाय सरकार आपल्यासोबत आहे

अशा शब्दात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन मानसिक आधार दिला.
लोहा कंधार विधानसभा मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी

आज लोहा तालुक्यातील बेटसांगवी, जवळा ,शेवडी, भेंडेगाव या गावांना तर कंधार तालुक्यातील देवयाचीवाडी, पेठवडज, शिरसी, गोणार, मसलगा आदी गावांना भेटी दिल्या. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासोबत आ.राम पाटील रातोळीकर, पांडूरंग बोरगावकर उपविभागीय अधिकारी, कंधारचे तहसीलदार

व्यंकटेश मुंडे, लोह्याचे तहसीलदार राम बोरगावकर, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, अधिकारी MSCB, पोलीस निरीक्षक, सोनखेड,तालुका कृषि अधिकारी यांच्यासह भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिलीप कंदकुर्ते, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.संतुकराव हंबर्डे, लोहा पंचायत

समितीचे सभापती आनंदराव पाटील ढाकणीकर, उपसभापती नरेंद्र गायकवाड, लक्ष्मण बोडके, मंडळ अध्यक्ष सुनिल मोरे, बाबुराव केंद्रे, डॉ. पंजाबराव वडजे, भगवान राठोड, गंगाप्रसाद यन्नावार, शंकरराव नाईक, बालाजीराव झुंबाड, खुशाल राजे, शाम महाराज, अण्णासाहेब पाटील, व्ही.जी.कदम गुरुजी, पंजाबराव वडजे, केरबा पाटील उपस्थित होते.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता नेटाने आणि धीराने पुढे चालण्याची गरज आहे. अतिवृष्टी भागाचे पंचनामे करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक मदत निश्चितपणे मिळेल असा विश्वासही खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.

Total Page Visits: 635 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top