श्रावणी मोटार ड्राविंग स्कूलचा 8 वर्धापन दिन उत्साहात साजरा..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > श्रावणी मोटार ड्राविंग स्कूलचा 8 वर्धापन दिन उत्साहात साजरा..!

श्रावणी मोटार ड्राविंग स्कूलचा 8 वर्धापन दिन उत्साहात साजरा..!

Spread the love

NANDED TODAY:3,August,2021 शहरातील श्रावणी मोटार ड्राविंग स्कूलचा 8 वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सदरिल उद्घाटन प्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंत राजे भोसले यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात

आले. श्रावणी मोटार ड्राविंग स्कूलचे संचालक बालाजी देवनाळे यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक व जिद्दीने स्वतःचे एक ड्राइविंग स्कूल काढायचे व स्वावलंबी व्हायचे हे त्यांनी मनोमन ठरवले होते .तो उच्चविद्याविभूषित असून नोकरीच्या मागे न

लागता स्वतःचा उद्योग सुरू केला. तोही प्रामाणिक पणे. बघता-बघता श्रावणी मोटार ड्राइविंग स्कूलला आठ वर्ष पूर्ण झाले व नवव्या वर्षात मोठ्या दिमाखदार पदार्पण करून ड्राइविंग स्कूल ची वाटचाल सुरू आहे. श्रावणी मोटार ड्रायव्हिंग स्कूल

च्या माध्यमातून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेऊन अनेक जण स्वतःचे वाहन तसेच इतरांच्या गाडीवर चालक-मालक म्हणून अनेक जण ‘परफेक्ट चालक’ म्हणून यशस्वी झाले आहेत . श्रावणी मोटार ड्रायविंग स्कूलचे विद्यार्थी आज नांदेड व

इतरत्र फार मोठ्या प्रमाणात आहेत. बालाजीने हे सारं वैभव आपणा  सर्वांचे सहकार्य , प्रेम, आपुलकी ,जिव्हाळा, मायेच्या सहाय्यानेच हे यशाचे शिखर तो गाठू शकला आहे .श्रावणी मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना अनेकांनी

शुभेच्छा दिल्या.यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस गणेश तादलापुरकर,क्रीड़ा मार्गदर्शक बालाजी शिरसिकर,एसबीआय बैंकचे विदेशी मुद्रा अधिकारी मनोजकुमार

वागदरीकर,जगन्नाथ पवार,गोविंद जाधव,संचालक मनीराम राठोड,दीपक सोनकांबळे,शंकर चव्हान,रोहित देवनाळे,मुख्याध्यापक बालाजी कोळी आदिनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Total Page Visits: 654 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top