
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये संस्कार म्हत्वाची भूमिका बजावत असतात,संस्कारां नुसारच व्यक्तीची जीवन शैली तयार होते आणी समाजात एक वेगळी ओळख निर्माण होत असते.
संस्कार म्हणजे नेमक काय,संस्काराची व्याख्या काय आहे?संस्काराची कुठलीही एक ठराविक व्याख्या नसुन,’’संस्कार म्हणजे दिले जाणारे ज्ञान किंवा सुधारल्या जानाऱ्या चुका”अशी साधारण व्याख्या आपण करू शकतो.

संस्कार सामान्यपणे शारिरीक,मानसिक,आध्यात्मिक,सामाजिक या स्रोतांद्यारे होत असतात.ते चांगले किंवा वाईट असु शकतात.
संस्काराचे प्रकार? हिंदु धर्मा मध्ये १६ धर्म संस्कार सांगितले आहेत, तर मनु ने १३ मुख्य संस्कार सांगितले आहेत.
मनु च्या म्हणण्या नुसार,जन्माल येताना प्रेत्येक व्यक्ती शुद्र म्हणूनच येतो,पण त्यावर ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य यांचे संस्कार झाल्याने तो शुद्रा पासून वेगळा होतो.
संस्कारांचा उगम? संस्कारांचा उगम मनु पासुन झाला.मनु ने सांगीतलेल्या गोष्टी आणी विचार हेच आपले संस्कार आहेत असे मानले जाते.
प्रथम संस्कार आई च्या र्गभामध्ये ६व्या महिण्या पासुन मुलांवर व्हायला लागतात.त्यामुळे तुकाराम महाराज म्हणता ‘’शुध्द बिजा पोटी फळे रसाळ गोमटी”मराठीत म्हन आहे ‘’बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा” “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात”मुलांवर १२ व्या वर्षापर्यंत होनारे संस्कारच त्यांच भवितव्य सांगतात.

मुलांवर संस्कार कसे करावे?-पालकांसाठी कान मंत्र- कुठलाच व्यक्ती वाईट नसतो त्याच्यावर झालेले संस्कार वाईट असतात.मुल आपल लवकर आयकत नसतात तर ते आपल अनुकरन करत असतात.पालकच जर टी.व्ही आणी मोबाईल गेम खेळत असतील तर मुल कशी अभ्यास करतील.तुम्ही घरात कस वागता,बोलतां,व्यक्त होता त्यानुसार प्रथम संस्कार मुलांवर होत असतात.
त्यांचे छंद जोपासा त्यांच्या कमतरता त्यांना भासुदेऊ नका.त्याच्या कलागुणांना वाव द्या.मुलांना कधीच मारू नका त्यांना समजुन सांगा,तुम्ही त्यांना समज़ुन घ्या,मारल्याने मुले तुमचा तिरस्कार करतील.

त्यांनी मागीतलेल्या गोष्टीना लगेच होकार किंवा नकार देऊ नका त्यावर विचार करा योग्य असेलतर होकार द्या नसेलतर त्यांना समज़ुन सांगा.घरात होनाऱ्या प्रत्येक निर्णयांमध्ये त्यांना सहभागी करा त्यामुळे त्यांना व्यवहारीक,सामाजिक ज्ञान होईल.
यशस्वी झालेल्या लोकांची घरात चर्चा करा चालू घडामोडी विशष विचार विनिमय करा.
त्यांचे निर्णय त्यांनाच घेऊद्या,सुरुवातीला येवढे चांगले संस्कारद्या कीते निर्णय योग्यच घेतील.
संस्कारां बद्दल आणखी जाणून घेऊया पुढील लेखात.
कृष्णा राऊत
(कवि,लेखक,वक्ता)
मो:८८०६८८८२७३
K.raut8484@gmail.com